कमी झोप घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या

कमी झोप घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरशी झोप न झाल्याने आळस येतो. परंतु, सतत कमी झोप घेतल्याने काही आजार होण्याची भीती सुद्धा जास्त असते. हे आजार किरकोळ वाटत असले तरी ते नंतर गंभीर स्तरावर पोहोचू शकतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी झोप घेतलीच पाहिजे. शरीराला योग्य प्रमाणात झोप न मिळाल्यास कोणते आजार होण्याची शक्यता असते, याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत.

हृदयावर परिणाम होतो
सतत कमी झोप घेतल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. यामुळे हार्टवर परिणाम होऊन हार्टच्या तक्रारी वाढू शकतात.

लठ्ठपणाची समस्या
कमी झोप घेणारांची जाडी ही जास्त असते. कमी झोप घेतल्याने आहार जास्त प्रमाणात घेतला जातो. त्यामुळे शरीर जास्त जाड दिसू लागते. ७ तास झोप घेतल्यास जाडी वाढत नाही. पण ४ ते ५ तास झोप घेतल्यास लठ्ठपणा वाढू शकतो.

डायबेटिसची शक्यता
कमी झोप घेतल्याने शरिरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम होतो. यामुळे डायबेटिस होऊ शकतो. कमी झोपेमुळे शरिरातील इंन्सुलिनचे प्रमाण कमी होते. ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हा त्रास होतो.

आयुष्य कमी होते 
कमी झोपेचा परिणाम शरिरावर होत असतो. शरीर आतून थकत जाते. एखादी व्यक्ती जर नेहमी कमी झोप घेत असेल तर त्याच्या आयुष्यातील तीस टक्के आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.

बुद्धीवर परिणाम
योग्य झोप न घेतल्याने स्मरणशक्ती कमी होते. कमी झोप घेतल्याने डोक्यातील पेशींवर विपरीत परिणाम होतो.

तणाव वाढतो
झोपेचा आणि तणावाचा जवळचा संबंध आहे. कमी झोप घेतली तर त्याचा परिणाम शरिरावर होऊन मानसिक ताण वाढतो. कमी झोप घेतल्याने बुद्धी व्यवस्थित काम करत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु