तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकदा तळपायात खूप जास्त प्रमाणात वेदना होत असतात. यामागील कारण काय आणि या वेदना होतात तरी कशा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तळपायातून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना गरम आहे की गार, वेदना आहे की सुखदायक हा फरक मेंदूत समजतो. तळपायातून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना या विजेच्या प्रवाहाप्रमाणे जात असतात.

अनेकदा तळपायांची आग आग होते. यामागील कारण खूप चालल्याने किंवा खूप वेळ उभे राहिल्याने त्रास होत असेल असा लोकांचा समाज असतो. पण खरं तर संवेदना नेणाऱ्या शिरांमधून जाणाऱ्या विजेच्या ‘करंट’ची गती बदलते. यामुळे तळपायांच्या पेशी गरम होत नाहीत. मेंदू त्याचा अर्थ ठरल्याप्रमाणे बदललेला लावतो. मेंदूत अनेक भागामध्ये सतत काम करणाऱ्या पेशी रासायनिक द्रव्ये तयार करतात. ही रासायनिक द्रव्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळात व विशिष्ट गतीने तयार होणे आवश्‍यक असते.

तळपायात होणार दुसरा महत्त्वाचा त्रास म्हणजे टाचा दुखणे. हा त्रास होण्यामागील कारण म्हणजे पायांमधील पदर काही ठिकाणी झिजतो, पातळ होतो किंवा फाटतो. प्रतयेक वेळी आपण चालतो तेव्हा पायाच्या आतील पदर ताणला जातो व परत पूर्ववत होतो. येथून निघणाऱ्या शिरा टाचेतून वर पायाकडे संवेदना नेतात. त्यामुळे रूग्णाला आपली टाच दुखते आहे, अशी भावना येते.

एकाच पावलावर कारण नसताना सूज आली, तर ते ‘मार्च फ्रॅक्‍चर’ असण्याची शक्‍यता असते. ‘मार्च फ्रॅक्‍चर’ म्हणजे पावलामध्ये अंगठ्यापासून दुसरे किंवा तिसरे हाड मोडणे. जेव्हा आपण नेहमीपेक्षा पाच सहा पटीने जास्त चालतो तेव्हा असा प्रकार घडतो. आपल्याला तेव्हा वेदना अस्थिभंगाप्रमाणे होत नाही. परंतु पावलावर सूज येते. हे हाड देखिल आपोआपच दुरुस्त होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु