औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय

औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून ते विविध क्रिया नियंत्रित करते. अल्कोहल, धुम्रपान, जास्त आंबट खाणे, जंक फूड, जास्त मिठाचे सेवन इत्यादी चुकीच्या सवयींमुळे लिव्हर लवकर खराब होते. लिव्हर खराब झाल्यास शरीराची कार्य करण्याची क्षमता अत्यंत क्षीण होते. लिव्हरला शरीरातील विषारी घटक प्रभावीत करतात. यामुळे लिव्हरचे उपचार करण्यापूर्वी रुग्णाचे रक्त शुद्ध असणे आवश्यक असते. यासाठी अतिरिक्त विश्रामाची आवश्यकता आहे. औषधे न घेता केवळ आहाराने लिव्हर निरोगी ठेवता येणे शक्य आहे. याबाबत आपण माहिती करून घेवूयात.

हे उपाय करा

१) जांभूळ या फळात लिव्हरचे आजार दूर करण्याची क्षमता आहे. दररोज १०० ग्रॅम जांभळाचे सेवन करावे. सफरचंद खाल्ल्यानेही लिव्हरला ताकद मिळते. लिव्हरवर सूज असल्यास खरबूजाचे सेवन करावे.

२) आवळा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असून याचे सेवन केल्याने लिव्हर उत्तमप्रकारे कार्य करते. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून ४-५ कच्चे आवळे अवश्य खावेत. यात लिव्हरला सुरक्षित ठेवणारे सर्व तत्त्व आहेत.

३) लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी सफरचंद व्हिनेगरचा उपयोग करावा. जेवण करण्यापूर्वी सफरचंदचे व्हिनेगर प्यायल्याने चरबी कमी होते. एक चमचा व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून यामध्ये एक चमचा मध टाकून, हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्यावे.

४) अनुलोम विलोम प्राणायाम, भस्रिका प्राणायाम सकाळी अवश्य करा. या सर्व नियमांचे पालन केल्यास लिव्हरच्या आजारांपासून दूर राहू शकता.

५) सकाळी उठून मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या. सकाळीच काही अंतर पायी चालावे आणि चालताना मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे लाभ होईल.

६) आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश करावी. मातीचा लेप आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीरावर अवश्य लावावा. आठवड्यातून एकदा तरी स्टीम बाथ घ्या. सन बाथही घेऊ शकता.

७) लिव्हरशी संबंधित आजार दूर करण्यासाठी आहार चिकित्साही आवश्यक आहे. म्हणजेच काय खावे आणि किती प्रमाणात खाणे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

८) लिव्हरच्या आजारात ज्यूसचे सेवन महत्त्पूर्ण मानले जाते. लिव्हरच्या रुग्णांनी नारळ पाणी, उसाचा शुद्ध रस किंवा मुळ्याचे ज्यूस घ्यावा. पालक, चवळी, भोपळा, गजर, शलजम ज्यूसही घेऊ शकता.

९) दिवसातून ३ ते ४ वेळेस लिंबूपाणी घ्यावे. भाज्यांचे सूप प्यावे. पेरू, नाशपाती, मोसंबी, डाळिंब, पपई इ. फळांचे भरपूर सेवन करावे.

१०) भाज्यांमध्ये पालक, करडी, मेथी, भोपळा, तोंडली या भाज्यांचे भरपूर सेवन करावे. सलाड, अंकुरित डाळीचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करावे. गाजराचे सूपही लिव्हरचे आजार दूर करण्यास सहायक ठरते. वाफेवर शिजलेल्या किंवा उकळलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

११) पालक आणि गाजर रसाचे मिश्रण लिव्हर सिरोसीसमध्ये रामबाण घरगुती उपाय आहे. गाजर आणि पालकाचा रस समान प्रमाणात मिसळून घ्यावा. लिव्हर ठीक करण्यासाठी हा नैसर्गिक रस दिवसातून कमीत कमी एक वेळेस तरी अवश्य घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु