गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

आरोग्यनामा ऑनलाइन – फुटाण्यांसोबत गूळ खाल्ला तर आरोग्याचे अनेक फायदे वाढतात. पुरुषांनी गूळ आणि फुटाणे खाल्ल्यास त्यांना अधिक फायदा होतो. हे फायदे कोणते हे आपण पाहुयात. गुळासोबत अद्रक खाल्ल्याने सांध्याच्या दुखण्यावर आराम मिळतो. गूळ आणि काळे तीळ खाल्ल्याने दम्यापासून बचाव होतो. तसेच गुळासोबत तूप मिसळून खाल्ल्याने कानदुखीची समस्या दूर होते. गुळासोबत सुंठ मिसळून खाल्ल्याने काविळीमध्ये फायदा होतो.

फुटाण्यांसोबत गूळ खाल्ल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे पुरुषांच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. यामध्ये फॉस्फरस असते. यामुळे दात मजबूत होतात. गूळ आणि फुटाण्यांमध्ये प्रोटीन अधिक असते. हे स्नायू मजबूत करण्यात मदत करते. फुटाणे आणि हरभऱ्यामध्ये फायबर असते. हे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये अमिनो अ‍ॅसिड्स, ट्रीप्टोफेन आणि सेरेटोनिन असते. यामुळे तणाव कमी होतो. हे उदासीनतेपासून बचाव करण्यात मदत करते.

फुटाण्यांसोबत गूळ खाल्ल्याने बॉडीचा मेटाबॉलिझम वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते. यातील पोटॅशियम हार्ट अ‍ॅटॅक टाळण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. यामुळे मेंदूची शक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. फुटाणे आणि गुळामध्ये झिंक असते. हे चेहऱ्याची चमक वाढवण्यात मदत करते. हे खाल्ल्याने स्मार्टनेस वाढतो. यामध्ये कॅल्शियम असल्याने यामुळे हाडे मजबूत होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु