तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुळस हे एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर तुळस हे एक उत्तम उपाय मानले जाते. अशाच तुळसचा दुधात टाकून सेवन करण्याचे फायदे आज जाणून घेऊ

image.png

ज्या व्यक्तीला  हृदयरोगाचा त्रास आहे त्यांनी नियमित सकाळी उपाशी पोटी जर  तुळस घातलेल्या दुधाचे सेवन केल्याने हृदयरोगाचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. तसेच ज्यांना किडनी स्टोन्सचा त्रास होत असेल अशा रुग्णांनाही या दुधाचे सेवन लाभकारी आहे.

image.png

तुळस हे अँटी बायोटिक असल्याने अनेक संसर्गजन आजारांपासून शरीराचा बचाव करण्यास सक्षम असते. ऋतुमान बदलत असताना जर श्वसनाचा त्रास होत असेल तर अशा लोकांनीही या दुधाचा सेवन करावा. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून या दुधाचा सेवन केल्यास तुम्हाला खूप चांगला फायदा होतो.

image.png

ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी जर रोज सकाळी चहा, कॉफीच्या ऐवजी तुळस घालून उकळलेल्या दुधाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तरी या आजारावरही या दुधाचा चांगला फायदा होतो.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु