पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावपळ, स्पर्धा, दगदग हे सध्या जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. सततच्या धावपळीमुळे शरीराकडे दुर्लक्ष होते. अशाच घाईगडबडीत एखाद्यावेळी दुखापत अथवा जखम होते. तसेच काही वेळा अंगदुखीमुळे वेदना होणे, सूज येऊन वेदना होणे, डोकेदुखी असे प्रकार होत असतात. यावेळी अनेकजण पेनकिलर घेतात. परंतु, कधी-कधी पेनकिलरनेही वेदना शांत होत नाहीत. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास वेदना थांबू शकतात. मुळातच पेनकिलर घेण्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले ठरते. वेदनेवर अतिशय गुणकारी अशी एक वनस्पती असून ती सर्वत्र उपलब्ध असल्याने सहज तिचा वापर करता येतो. याच नैसर्गिक पेनकिलरबाबत आपण माहिती घेणार आहोत.

ही आहे नैसर्गिक पेनकिलर

निर्गुंडी ही वनस्पती उत्तम वेदनाशामक असून इतर वेदनाशामक औषधांचे, गोळ्यांचे जसे दुष्परिणाम असतात तसे या वनस्पतीचे नाहीत. कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीचा पाला प्रभावी आहे.

असा करा उपाय

* वेदना कमी करण्यासाठी निर्गुंडीची पाने पाण्यात उकळून घ्यावीत. गरम पाण्यात सुती कपडा भिजवून सुजलेल्या किंवा वेदनेच्या ठिकाणी शेक द्यावा. या उपायाने अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखत असल्यास या वेदना थांबतात.

* कफ, खोकला, फुफुसावरील सूज कमी करण्यासाठी निर्गुंडीच्या पानांवर तूप लावून पाने गरम करून पाठीवर, छातीवर बांधावीत. चांगला फरक पडतो.

* मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि लसुन भाजून त्या तेलाने मालिश केल्यास अंगदुखी थांबते.

हे पदार्थ देखील उपयोगी

* अक्रोडच्या तेलाने मालिश केल्यास हात-पायाच्या सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

* लसणाची एक पाकळी चावून-चावून खाल्ल्यानंतर गुळणी केल्याने दातदुखी १० सेकंदात थांबते.

* पोटदुखत असल्यास थोडेसे जिरे तव्यावर गरम करून चूर्ण तयार करा. हे २-३ ग्रॅम चूर्ण गरम पाण्यातून दिवसभरात तीन वेळेस घ्यावे. लवकर आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु