‘या’ आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती करते आपल्या निरोगी पेशींवर हल्ला

‘या’ आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती करते आपल्या निरोगी पेशींवर हल्ला

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास आपले विविध आजारांपासून रक्षण होते. यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे खुप महत्वाचे आहे. परंतु, स्वप्रतिरक्षित रोग म्हणजेच ऑटोइम्यून डिसऑर्डर या आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करते. याचा परिणाम शरीरातील विविध भागांवर होतो. हा रोग कशामुळे होतो याचे कारण शोधण्यात अद्याप शास्त्रज्ञांना यश आलेले नाही.

काय सांगतात तज्ज्ञ

१) हा आजार अनुवांशिक असू शकतो.
२) अफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक-अमेरिकी आणि मुळ अमेरिकी महिलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
३) स्वप्रतिरक्षित रोगाचे ८० पेक्षा जास्त प्रकार असून यापैकी काहींची लक्षणे सारखीच असतात.
४) लक्षणे एकसारखी असल्याने चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञांना कठीण जाते.
५) याचे निदान करणे खूपच कठीण आणि त्रासदायक आहे.

ही आहेत लक्षणे

* थकवा जाणवणे
* मांसपेशीमध्ये दुखणे
* हलका ताप येणे
* दाह होणे, लाली, जळजळ, दुखणे आणि सूज येणे

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु