डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम

डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोकेदुखी हा सामान्य आजार असला तरी हा त्रास होत असल्यास कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. डोकेदुखीची कारणे वेगवेगळी असू शकतात. सलग काम केल्यामुळे किंवा खुपवेळ कॉम्प्युटरसमोर बसल्याने डोकेदुखी होऊ शकते. अशाप्रकारची सामान्य डोकेदुखी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते केल्याने चांगला फरक पडतो.

हे उपाय करा

* दालचिनी पाण्यामध्ये उगाळून पातळ लेप डोक्याला लावा.

* लिंबू-सरबत घेतल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळू शकतो.

* सकाळी-सकाळी एक सफरचंद खावे. डोकेदुखी थांबते.

* वाळवलेले अद्रक पाण्यामध्ये उगाळून हा लेप डोक्याला लावा.

* डोकेदुखीमध्ये काकडी कापून वास घ्यावा. काकडी डोक्यावर रगडावी.

* डोकेदुखीमध्ये कच्चा पेरू बारीक कुटून सूर्योदयापूर्वी हा लेप डोक्याला लावावा.

* भोपळ्याचा गर डोक्याला लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु