यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  यकृत हे आपल्या शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे. यकृतासंबंधी  जर एकदा समस्या निर्माण व्हायला  लागल्या तर हे आपल्या जिवावरही बेतू शकत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दीर्घायुष्यासाठी यकृताची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपण काही घरगुती उपाय करूनही आपल्या यकृताची चांगली काळजी घेऊ शकतो.

१) हळद :

आपल्या रोजच्या आहारातील हळद ही खूप गुणकारी आहे. हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच हळद ही अ‍ॅन्टीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असल्याने यकृताचे कार्य सुधारण्यास नक्कीच मदत करते. हळदीत असणाऱ्या अ‍ॅन्टीव्हायरल घटकांमुळे ‘हेपेटायटीस बी’ व ‘हेपेटायटीस सी’ अशा  विकारांच्या रोगजंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यास हळद मदत करते.

यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

२) अ‍ळशी :

यकृताची समस्या निर्माण होऊ नये असे वाटत असल्यास अळशीचा आहारात वापर करा. यामुळे तुमच्या यकृतावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते. तसेच अळशीमधील काही घटक हार्मोन्सचे संतुलन व कार्य सुरळीत राखते.

यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

३) पालेभाज्या :

पालेभाज्या या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच काही भाज्या निरोगी यकृतासाठी आवश्यक एन्झाइम्स ग्रहण करण्यास मदत करतात. बीट, कोबी, ब्रोकोली, कांदा, लसूण अशा भाज्या आहारात ठेवा. ब्रोकोली, कांदा, लसूण यांमध्ये सल्फर अधिक प्रमाणात असल्याने आपले यकृत नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते.
यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

४)  आवळा :

आवळ्यामध्ये व्हिटामिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. आवळ्याचा अर्क यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतो. तसेच आवळा आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि पचनसंस्थेचे कार्य सुधारतो. त्यामुळे आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करा.

यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

५) गुळवेल  :

काहींना यकृताच्या समस्येला सामोरे जावे लागते.  यकृताच्या विकारांवर प्रभावशाली औषधं म्हणजे गुळवेल कारण हे शरीरातील विषारी घटक दूर करते. तसेच यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करते. याचा आपल्या शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे आपण याचा कायमस्वरूपी वापर करू शकतो.

यकृताच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु