‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अनेकदा मानसिक आणि शारीरीक शांतता लाभत नाही. डोके आणि शरीर थंड राहणे हे खूप महत्वाचे असते. उष्ण वातावरण असल्यास डोके आणि शरीराची उष्णता वाढते आणि त्रास जाणवतो. अशा स्थितीत काही घरगुती उपाय केल्यास डोके शांत होते. तसेच शरीराला भरपूर उर्जा मिळते.

आवळा
आवळा व्हिटॅमिन-सीचा चांगला स्त्रोत असून एका आवळ्यामध्ये ३ संत्र्यांएवढे व्हिटॅमिन सीचे प्रमाण असते. याच्या सेवनाने फुफ्फुसांना शक्ती मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. १ किंवा २ आवळे खाल्ल्यास डोळे, त्वचा, बध्दकोष्ठता, डोकेदुखी आणि शरीरामध्ये असलेले उष्णतेचे प्रमाण कमी होते. रोज सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात.

खरबूज
खरबूजामध्ये पोषक तत्व आणि व्हिटॅमिन कमी असले तरी या फळामध्ये ९५ टक्के पाणी असते. याच्या पासून सरबत, ज्यूस, जेली आण जॅम तयार केले जाते. सलाड, आइसस्क्रिम आणि मिल्क शेकसमध्येसुध्दा हे सेवन केले जाते.

पाणी
शरीराला आवश्यक तेवढे पाणी दररोज प्यायल्याच हवे. पाणी शरीराला थंढ ठेवण्यास मदत करते. पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता बाहेर जाते. रोज कमीत-कमी ८-१० ग्लास स्वछ पाणी प्यायला हवे.

आइस्क्रिम
काही डेअरी प्रॉडक्टसह चीज आणि आइस्क्रिमसुध्दा कॅल्शिअमसाठी चांगले असते. आइस्क्रिममूधन व्हिटॅमिन डी, ए, बी १२ आणि के मिळते. यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच त्वचा कोमल होते. नसांसाठी आणि रक्तप्रवाहासाठीसुध्दा ते लाभदायक आहे.

लिंबू 
पचनक्रियेसाठी, दुखण्यावरील हे रामबाण औषध रक्त शुध्दीकरणासाठी गुणकारी मानले जाते. यामुळे शरीराची उर्जा वाढते. नियमित सेवनाने मज्जातंतू आणि हृदय स्वस्थ राहते. लिंबूमध्ये सिट्रीक, अम्ल, शर्करा, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी असते.

टरबूज
टरबूजमध्ये लाइकोपिन असते. लाइकोपिन त्वचेला टवटवीत बनवते. टरबूज हृदयासंबंधीत आजार दूर करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. लठ्ठपणासुध्दा कमी करते. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्यांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत करण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु