योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : वाढत्या वयासोबत निमोनिया होणे सामान्य गोष्ट आहे.वयासोबतच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते. यामुळे असे आजार होणे सामान्य गोष्ट आहे. डायबिटीज असलेल्या लोकांना हा प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे. यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, स्मोकिंग करणे, यामुळे हा आजार होतो.

बॉडीची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे निमोनिया होतो. यासोबतच स्मोकिंगमुळे लंग्स खराब होतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणखी कमी होते. थंडी वाजून येणे तसेच १००.४ पेक्षा जास्त ताप येणे. हा फुप्फुसामध्ये इन्फेक्शनचा पहिला संकेत आहे. श्वास घेण्यास त्रास होणे हे फुप्फुसामध्ये इन्फेक्शन सुरू असल्याचे लक्षण आहे. अत्याधिक प्रमाणात कफ जमा होणे हा लंग्स इन्फेक्शनचा धोका आहे. काहीवेळा कफचा रंगही बदलतो. छातीमध्ये एका बाजूला त्रास होतो, श्वास घेताना त्रास वाढतो. यामुळे छातीवर दबाव जाणवतो.

या आजाराला दूर ठेवण्यासाठी थंडीपासून दूर राहावे. एसीचा वापर करू नये. थंडीच्या दिवसांमध्ये संपूर्ण काळजी घ्यावी. बस, रेल्वे, थिएटर आणि जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. इन्फ्लूएंजाचे इंजेक्शन प्रत्येक वर्षी घ्यावे. नेमोवेकचे इंजेक्शन लहान मुलांना द्यावे. तसेच ६५ वयानंतर पुन्हा घ्यावे, ही काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु