कोलेस्टरॉलने त्रस्त असल्यास करा ‘हे’ उपाय

कोलेस्टरॉलने त्रस्त असल्यास करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात वाईट कोलेस्टरॉलची पातळी वाढली की विविध आजारांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु, शरीराला चांगल्या कोलेस्टरॉलची आवश्यकता असते. कारण शरीराला काही प्रमाणात कोलेस्टरॉलची गरज असते. काही वेळा नकळतपणे जेवणात अधिक सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टरॉलचा समावेश झाल्यास एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्टरॉलची पातळी वाढू लागते. वाढलेली कोलेस्टरॉल पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. यासाठी काही उपाय घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. हे उपाय कोणते ते पाहुयात.

डायटमध्ये निश्चित प्रमाणात फॅट असला पाहिजे. रोजच्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीच्या सुमारे २५ ते ३५ टक्के फॅटचे सेवन करणे गरजेचे आहे. ऑलिव्ह ऑइल आणि सूर्यफुलाच्या तेलात आढळून येणारा अनसॅच्युरेटेड फॅट एलडीएल कमी करण्यासाठी आणि एचडीएल वाढवण्यासाठी मदत करतो. ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट आवश्यक घटक आहे, परंतु इतर अनेक घटक यापेक्षाही अधिक फायदेशीर असतात. त्यासाठी सर्व प्रकारचे धान्य आणि हिरव्या शेंगभाज्यांचे सेवन करावे. यामुळे कोलेस्टरॉलची पातळी कमी होईल आणि तुम्हाला दीर्घ काळापर्यंत भूक लागणार नाही.

न्याहरीमध्ये एक बाउल ओटमील किंवा सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचे सेवन करावे. यातून फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर मिळतात. तसेच एलडीएल कोलेस्टरॉल कमी होण्यासह वजन नियंत्रित करण्यातही मदत होईल. जास्त जेवल्याने कोलेस्टरॉलची पातळी वाढते. ही पातळी वजन वाढवण्यासही जबाबदार असते. मूठभर सुका मेव्याचे सेवन करावे, जेणेकरून कोलेस्टरॉलची पातळी कमी करता येईल. सुका मेव्यामध्ये भरपूर मोनोसॅच्युरेटेड फॅट असतो. हा फॅट एलडीएलची पातळी कमी करणे आणि चांगला कोलेस्टरॉल वाढवण्यास मदत करतो. एका संशोधनानुसार दररोज एक औंस म्हणजे २८ ग्रॅम सुका मेव्याचे सेवन केल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु