शरीरात हे बदल जाणवल्यास त्वरित करा थायरॉइडची तपासणी

शरीरात हे बदल जाणवल्यास त्वरित करा थायरॉइडची तपासणी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गळ्यात असणारी थायरॉइड ही ग्रंथी मेटाबॉलिक प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते. ही ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसल्यास विविध समस्या निर्माण होतात. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. वेळीच उपचार सुरू झाल्यास शरीराचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी थायरॉइडची लक्षणे कोणकोणती आहेत, याविषयी जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

काहीही न करता वजन कमी होत असेल याचा अर्थ कुठला तरी आजार शरीराला पोखरत आहे. हा आजार थायरॉइडही असू शकतो. हायपरथायरॉडिझम असल्यास वजन कमी होते. तसेच हायपोथाइरॉडिझम असेल तर वजन वाढते. तसेच उदासीनता किंवा अस्वस्थतादेखील थायरॉइडचे लक्षण असू शकते. परंतु, हे कारण या आजाराच्या तपासणीसाठी पुरेसे नसल्याचे तज्ज्ञ सांगातात. उदासीनतेसोबतच जास्त झोप येणे, झोपच न येणे, कामात मन न लागणे ही थायरॉइडची लक्षणे असू शकतात.

सामान्य दिनचर्या असूनही जर थकवा असेत तर शरीरात काही तरी समस्या असू शकते. याचे कारण थायरॉइडही असू शकते. ही समस्या गंभीर असल्यास थकवा जास्त जाणवतो व अस्वस्थतादेखील वाढते. तसेच केस रुक्ष होणे, जास्त प्रमाणात गळणे, त्वचेवर पापुद्रा, त्वचा रुक्ष होणे या थायरॉइड ग्रंथींशी संबंधित समस्या आहेत. घश्यात जास्त दिवस सूज किंवा दुखत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जावे. शारीरिक श्रम न करता मांसपेशींमध्ये आणि सांध्यामध्ये असह्य वेदना होणे हे देखील थायरॉइडचे लक्षण असू शकते. कमी वजनदेखील उचलले तरी मासंपेशी आणि सांध्यात वेदना होत असतील तर हे लक्षणदेखील थायरॉइडचे लक्षण आहे. हातात मुंग्यादेखील येतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु