गंभीर आजार रहातील दूर, फक्त १ चमचा चूर्ण घ्या

गंभीर आजार रहातील दूर, फक्त १ चमचा चूर्ण घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आवळा, हरड आणि बेहडा याचे मिश्रण म्हणजे त्रिफळा चूर्ण होय. हे तिन्हीही आयुर्वेदिक पदार्थ शरीरासाठी लाभदायक आहेत. ते एकत्र केल्याने त्याचे फायदे आणखी वाढतात. सकाळ-संध्याकाळ दोन चमचे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने त्वचारोगापासून आराम मिळतो.

त्रिफळाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि इतर आजार दूर होतात. त्रिफळा पावडरने दात स्वच्छ केल्याने दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो. त्रिफळा नियमित घेतल्याने श्वासांच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे फुप्फुसांचा संसर्ग दूर करते. तसेच त्रिफळा अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. याच्या पाण्याने जळजळ लवकर बरी होते. त्रिफळा पेन्क्रियाज अ‍ॅक्टिव्ह ठेवते. ज्यामुळे रक्तामध्ये इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर आणि एक चमचा मध मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. त्रिफळा अँटिऑक्सिडंट असते. हे नियमित घेतल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. रात्री मातीच्या भांड्यात एक चमचा त्रिफळा पावडर पाण्यात भिजवून ठेवा. हे सकाळी पाण्याने गाळून प्यायल्याने डोळ्यांची शक्ती वाढते आणि डोळे धुतल्याने डोळ्यांची जळजळ दूर होते. श्वसनाशी संबधित आजारांमध्ये त्रिफळा लाभदायक ठरते. याचे सेवन केल्याने श्वास घेण्यात येणारी अडचणी दूर होते.

त्रिफळा औषधीने कॅन्सरवर आराम मिळतो यामध्ये अँटी-कॅन्सर तत्त्व आहेत. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील कॅन्सर कोशिकांच्या विकासाला कमी केले जाऊ शकते, असे एका संशाधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्याने पोटात कृमी (जंत)ची समस्या नष्ट होऊ शकते. खरुज किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यास त्रिफळा लाभदायक आहे. त्रिफळा, शरीरातील रक्त कोशिका वाढवते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु