हाडाला मार लागल्यास करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

हाडाला मार लागल्यास करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपला जर कुठे अपघात झाला तर आपले हाड मोडते. जे हाड मोडले आहे ते जर सुजले तर आपल्याला ते त्याची हालचाल करणेही जड जाते. यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला प्लास्टर करतो. पण त्यांची सूज ओसरे पर्यंत आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे याच्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. हाडांना मार लागून त्याला सूज येते. ही जर लवकर ओसरली नाही तर निर्गुडीची वनपस्ती हा याच्यावर उत्तम उपाय आहे.

१) यासाठी आधी निर्गुडीच्या पानांना पाण्यात उकळा. जेव्हा पाण्यातुन वाफ निघेल तेव्हा भांड्यावर जाळी ठेवा. दोन छोटे कपडे पाण्यात भिजवुन पिळुन घ्या. नंतर हे एका नंतर एक जाळीवर ठेवुन गरम करा. सुज किंवा दुखणा-या ठिकाणी ठेवुन शेकुन घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

२) तुमच्या हाडाला जर कुठं मार लागला असेल तर मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि लसून जाळून त्या तेलाने मालिश केल्याने तुमची सूज कमी होऊ शकते.

३) जी-याला तव्यावर शेका आणि २-३ ग्राम प्रमाण घेऊन पाण्यासोबत दिवसातुन तीन वेळा सेवन करा. हे चावुन खाल्ल्यानेसुध्दा आराम मिळतो.

४) हाडाला मार लागून जर सूज आली तर अक्रोडाच्या तेलाने मालिश केल्याने आखडलेले हात-पाय चांगले होतात.

५) निर्गुंडीच्या बिया बारीक करुन याच्या १० पुड्या बनवा. सकाळी लवकर उठुन शुध्द तुप आणि गूळ मिक्स करून पीठाचा हलवा बनवा. त्यामध्ये एक पुडी मिळावा. आणि त्याचे सेवन करून आराम करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु