‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. डोळ्यांमुळेच आपण हे जग पाहू शकतो. डोळे नसतील तर सर्व अंधारच आहे. डोळ्यांशिवाय जगणे ही कल्पना देखील अनेकांना अस्वस्थ करणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. दृष्टी कमी झाल्यास चष्मा लागतो. कालांतराने चष्म्याचा नंबरही वाढत जातो.

शिवाय डोळ्यासंबंधीचे विकार होण्यास सुरूवात होते. ज्यांना चष्मा नाही अशां व्यक्तींनी सुद्धा डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. नजर तीक्ष्ण होण्यासाठी, तसेच डोळ्याच्या आजरांपासून दूर राहण्यासाठी काही उपाय आणि काळजी घेणे खूप गरजेचे आहे.डोळ्यांची काळजी घेण्यासाठी जास्तवेळ कॉम्प्यूटर स्क्रीनकडे पाहू नये. दहा- दहा मिनिटाला काही क्षणांसाठी स्क्रीनवरून नजर हटवावी.

प्रत्येक दहा मिनिटांनी काही क्षणांकरिता डोळे बंद करावेत. दिवसातून कमीत-कमी ५ ते १० वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. दर दहा मिनिटांनी स्क्रीनवरून डोळे हटवून लांबपर्यंत पाहावे. दररोज सकाळी डोळ्यांचा व्यायाम करावा. सकाळी डोळे बंद करून ध्यान करावे. हिरव्या पालेभाज्या खाण्यात याव्यात. पायात चप्पल न घालता गवतावर चालावे. त्यामुळे नजर तीक्ष्ण होते. कॉम्प्यूटर स्क्रीन आणि डोळ्यांमध्ये कमीत कमी दोन फूट अंतर असावे, अशा प्रकारे काळजी घेतल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिल. शिवाय चष्मा असल्यास त्याचा नंबर वाढणार नाही. आणि ज्यांना चष्मा नाही त्यांना कधीही चष्मा वापरण्याची वेळ येणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु