पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि मसालेदार पदार्थांमुळे पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होऊन आतड्यांना आतून व्रण पडतात. यास पोटाचा अल्सर म्हणतात. याकडे दुर्लक्ष केल्यास हे व्रण मोठे होतात आणि जखमा होतात. तसेच पोटातील बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे ही समस्या होऊ शकते. पोटाचा अल्सर झाल्याचे काही संकेत शरीर देत असते. हे संकेत ओळखल्यास वेळीच औषधोपचार करता येतात.

अल्सरचे अनेक प्रकार आहेत. पेप्टिक अल्सर झाल्यामुळे पोटात आतून व्रण पडतात. तसेच गॅस्ट्रिक अल्सर झाल्यावर जेवणानंतर पोटात वेदना सुरू होतात. परंतु डायजिनसारखे औषध घेतल्यावर आराम मिळतो. ड्युडिनल अल्सरची समस्या झाल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहिल्यास पोटात वेदना होतात. जेवण केल्यानंतर आराम मिळतो. इसोफेगल अल्सरमध्ये आहाराच्या नलिकेवर व्रण किंवा छिद्र होतात. यामुळे तीव्र जळजळ होते. पोटात अल्सर असल्यास जेवण केल्याच्या १ किंवा २ तासांनंतर किंवा रात्रीच्या वेळी पोटाच्या वरच्या भागात किंवा मधोमध जळजळ होते. हा अल्सरचा संकेत असू शकतो. तसेच वारंवार उलट्या होणे किंवा मळमळणे पोटाच्या अल्सरचा संकेत असू शकतो. शिवाय पोट फुगण्याची समस्या हा अल्सरचा संकेत असू शकतो.

दीर्घकाळापासून डार्क किंवा काळ्या रंगाच्या शौचाची समस्या असेल, तर दुर्लद्व करू नये. अल्सरमध्ये होणाऱ्या ब्लीडिंगमुळे असे होऊ शकते. पोटातील अ‍ॅसिड वरच्या बाजूला अन्ननलिकेमध्ये येते. यामुळे छातीच्या आजूबाजूला तीव्र जळजळ होते. हा अल्सरचा संकेत असू शकतो. उलट्यांमध्ये थोडेसे रक्त येणे, अचानक वजन कमी होणे, हे अल्सरचे संकेत असू शकतात. जेवणाच्या १ किंवा २ तासांनंतर किंवा रात्री असे वाटते की, पोटात काही तरी टोचत आहे. असे होत असल्यास अल्सरचा संकेत असू शकतो. सतत पोटात वेदना होणे किंवा काही खाल्ल्यानंतर पोटात तीव्र वेदना सुरू होणे, विनाकारण वारंवार भूक लागणे, हा अल्सरचा संकेत असू शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु