डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हे मनाचा आरसा असतात. मनातील सर्व हावभाव डोळ्यात दिसतात. अनेकदा आलेल्या अनुभवावरून ही गोष्ट प्रत्येकाला पटू शकते. परंतु कोणताही आजार असल्यास त्याची लक्षणेसुद्धा डोळ्यात दिसतात. डोळ्यात काही बदल झाल्यास एखाद्या आजाराचा हा संकेत असू शकतो. डोळे बघून आजाराचे संकेत कसे ओळखावेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

ब्रेन ट्यूमर 
डोकेदुखी, थकवा, आळशीपणा इत्यादी ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत. या आजारामुळे नजर अस्पष्ट होते. तसेच बघण्यासाठी त्रास होतो. शिवाय, डोळ्याचा रंगसुध्दा बदलतो.

कावीळ
किटाणुंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सुमारे एका महिन्यात कावीळीची लक्षणे दिसू लागतात. डोळे पिवळे दिसू लागतात.

लीव्हर
लीव्हरच्या पेशींवर सुज आल्याने भूक लागणे बंद होते आणि अस्वस्थता वाढते.  डोळ्यांवरही परिणाम दिसून येतो.

थायरॉइड 
जास्त थकवा येणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, सतत भूक लागणे इत्यादी थायरॉइडची मुख्य लक्षणे आहेत. थायरॉइडची समस्या असल्यास डोळे सुजलेले दिसतात.

मोतिबींदू 
मोतिबींदूमुळे नंतर अंधळेपणा येऊ शकतो. या आजाराच्या सुरूवातीला थोडे अस्पष्ट दिसते. हळूहळू डोळ्यात एक डागसुध्दा दिसून येतो.

अ‍ॅलर्जी 
डोळ्याला खाज येणे आणि डोळे लाल होणे ही अ‍ॅलर्जीची लक्षण आहेत. अ‍ॅलर्जी झाल्यास कधीही सर्दी होते.

उच्चरक्तदाब  
उच्चरक्तदाब झाल्यास डोळ्यांचा रंग लाल होता. कधी-कधी डोळ्यावर सुजसुध्दा येते.

नैराश्य 
सतत तणावाखाली राहिल्यास अनिद्रेची समस्या जाणवते. त्यामुळे डोळे लाल होण्याचे लक्षण दिसून येते.

अर्धांगवायू 
डोळ्यांच्या पापण्या हलत नसल्यास हे अर्धांगवायूचे मुख्य लक्षण मानले जाते. स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द अचानक अडखळणे आणि रक्तप्रवाह अचानक वाढणे हे अर्धांगवायू होण्याचे लक्षण आहे.

मधुमेह  
डोळ्यांची नजर कमी होणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे, जखम लवकर बरी न होणे, अचानक भूक वाढणे, त्वचेचे आजार होणे, इत्यादी मुधुमेह झाल्याची लक्षण आहेत. मधुमेह झाल्यास डोळ्यांच्या पापण्यांचा रंग थोडा बदलल्यासारखा दिसतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु