‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा हा अतिशय त्रासदायक आजार आहे. यावर वेळीच उपचार केला नाही तर त्यामुळे रुग्णाला खूप त्रास होतो. नंतर याची शस्त्रक्रिया करून तो खडा बाहेर काढावा लागतो. परंतु, शस्त्रक्रिया नंतर हा त्रास पुन्हा जाणवू शकतो. त्यामुळे या आजरावर वेळीच उपाय केला तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. तुम्ही काही घरगुती टिप्स वापरून या आजारावर नियंत्रण मिळवू शकता.

१) ओवा 

ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

२) केळी 

केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

३) तुळस

तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

४) द्राक्षे 

या मोसमांत द्राक्षेही चांगली येतात आणि किडनी स्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे. वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळू शकतो. मात्र, ग्रस्तांनी यावर तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु