उंच टाचेच्या सँडल गर्भधारणेसाठी ठरतात घातक, आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव

उंच टाचेच्या सँडल गर्भधारणेसाठी ठरतात घातक, आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव

आरोग्यनामा ऑनलाइन – उंच टाचांचे सँडल वापरल्याने कमरेच्या वेदना, पाय आणि अंखुल्यांची समस्या होऊ शकते. संशोधनानुसार जर टाचेची उंची पाच इंचापेक्षा अधिक असेल तर हे शरीराला अस्वाभाविक पॉश्चर अवलंबण्यास प्रवृत्त करते. यामुळे महिलांना गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. खराब पॉश्चरचा शरीराच्या तंत्रावर वाईट परिणाम होतो. यामध्ये गर्भाशय आणि प्रजनन तंत्रही सहभागी आहे. यामुळे मासिक चक्र अनियमित होते. डिसमेनोरिया आणि मासिक पाळीत वेदना होतात.

प्रजनन तंत्र
किशोरवयीन मुलींनी उंच टाचेची चप्पल अथवा सँडल घालू नये. त्यांचे शरीर पूर्णपणे विकसित झालेले नसते. झुकलेले पॉश्चर अथवा असंतुलित आणि अनिश्चित गर्भाशयाला त्याच्या नियत स्थितीतून हटवतो. ज्यामुळे मासिक चक्र आणि प्रजनन तंत्रासंबंधित कार्यादरम्यान वेदना होतात.

मातृत्वसंबंधी समस्या
उंच टाचेच्या चप्पला वापरल्यास पुढे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लग्नानंतर त्यांना मुलांना जन्म देतेवेळी अडचणी येतात. वेदनाही अधिक होतात. मातृत्वसंबंधी समस्या उद‌्भवतात. त्यांचे पॉश्चर तसेच स्पाइनचे अलाइनमेंटही बिघडते. यामुळे अंगाची कार्यप्रणालीदेखील बिघडते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु