‘हे’ आहेत तुळशीचे ३ प्रकार, पावसाळ्यातील रोगांना रोखण्याची क्षमता जाणून घ्या

‘हे’ आहेत तुळशीचे ३ प्रकार, पावसाळ्यातील रोगांना रोखण्याची क्षमता जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदामध्ये तुळस खूप महत्वाची मानली जाते. विविध आजारांवर तुळस गुणकारी आहे. तुळस सौंदर्य वाढविण्यासाठी आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक ठरते. आपल्याकडे घरोघरी तुळशीची रोपे दिसून येतात. तुळशीच्या पानांचा वापर काही खाद्यपदार्थांमध्येही केला जातो.

तुळशीचे प्रकार

१)राम तुळस – राम तुळशीचा रंग गडद हिरवा असतो.

२)कृष्ण तुळस – कृष्ण तुळशीचा रंग काळपट असतो आणि वास राम तुळसीपेक्षा जास्त उग्र असतो.

३)रान तुळस – रान तुळस ही जास्त करून रानात आढळते, पण तिच्या पानांचा वास अति उग्र असतो. तिच्या मंजुळांचा आकारही मोठा असतो.

हे उपाय करा

* खोकल्याचा त्रास असेल तर तुळशीच्या पानांचा रस आणि आडुळासा पानांचा रस समान मात्रामध्ये घेऊन सेवन केल्यास लवकर आराम मिळेल.

* तुळस आणि अद्रकाचा रस समप्रमाणात घेतल्यास खोकला लवकर बरा होण्यास मदत होते.

* चार-पाच लवंगा भाजून तुळशीच्या पानांच्या रसामध्ये मिसळून सेवन केल्यास लगेच आराम मिळेल.

* मलेरियामध्ये तुळस रामबाण औषध आहे. तुळस आणि काळे मिरे एकत्र करून काढा तयार करा. हा काढा मलेरिया झालेल्या रुग्णाला दिल्यास आराम मिळेल.

* मलेरिया आणि डेंगींच्या तापाचा प्रभाव कमी करण्यातही तुळस गुणकारी ठरते.

* महिलांनी मासीक पाळीत पोट किंवा कंबरदुखीमध्ये एक चमचा तुळशीचा रस घ्यावा तसेच तुळशीचे चार-पाच पाने चावून-चावून खावी.

* सकाळी पाण्यामध्ये तुळशीचे पाने टाकून ते पाणी पिल्यास संसर्गजन्य आजार होत नाहीत.

* डाग, खाज आणि त्वचेच्या आजारांत तुळशीच्या पानांचा अर्क लावल्यास काही दिवसात त्वचारोग दूर होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु