पोर्टेबल ऑपरेशन रूम पाहिली का ?

पोर्टेबल ऑपरेशन रूम पाहिली का ?

आरोग्यनामा ऑनलाइन सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येईल, अशी पोर्टेबल ऑपरेशन रूम तयार करण्यात यश आले आहे. आयआयटी आणि आयडीसीमध्ये शिकणाऱ्या २९ वर्षीय दिनोज जोसेफ यांनी ही पोर्टेबल ऑपरेशन रूम तयार केली आहे. इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरचे प्राध्यापक विजय बापट आणि पुण्यातील लायप्रोस्कोपीक सर्जन डॉ. हेमंत भंसाली यांनी ही रूम तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे.

१२-१३ एप्रिल रोजी मुंबई आयआयटीत अयोजित बेटीक उपक्रमाअंतर्गत इंजिनीयरींगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले मेडिकल डिव्हाईस सादर करण्यात आले. यामध्ये दिनोज यांनी तयार केलेले पोर्टेबल ऑपरेशन रूम या उपक्रमाअंतर्गत सादर करण्यात आले होते. ही रूम डिस्पोजेबल प्लॅस्टिकने तयार केली आहे. या प्लॅस्टिकची सहजरित्या घडी करता येते. शिवाय वजन हलके असल्याने दररोज वापरत असलेल्या बॅगेतून ने-आण करता येते. याबाबत दिनोज यांनी सांगितले की, हेमलकसामध्ये डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबत काम करताना जाणवले की अतिदुर्गम भागात एखादी शस्त्रक्रिया किंवा महिलेची प्रसूती करायची असेल तर रूग्णाला रूग्णालयात नेणे शक्य होत नाही.

अशावेळी ही पोर्टेबल ऑपरेशन रूम गरजेची आहे. ही रूम प्लॅस्टिकची असून याला डॉक्टरांचं अ‍ॅपरन शिवून घेण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांना या अ‍ॅपरनच्या आत जाऊन शस्त्रक्रिया करावी लागेल. रूग्णाच्या घरी सहजरित्या ही रूम उभारता येईल. ज्या खाटेवर रूग्ण आहे त्याभोवती ही रूम उभारता येईल. एकावेळी चार सर्जन या रूममध्ये शस्त्रक्रिया करू शकतात. विशेष म्हणजे या रूममध्ये शुद्ध हवेसाठी एक छोटा भाग आखण्यात येणार आहे. अजून ही रूम प्राथमिक स्वरूपात असून यामध्ये उपकरणे आणि इतर बाबी उपलब्ध करण्यासाठी विचार सुरू आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु