‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुष्यात करिअरची दिशा ठरवण्यासाठी दहावी- बारावीचे वर्ष महत्वाचे मानले जाते. त्यामुळे दहावी- बारावीच्या निकालांना अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर ते लगेच निराश होतात. मात्र दहावी- बारावीला कमी मार्क मिळाले म्हणजे करिअरच्या चांगल्या वाटा बंद झाल्या असे काही नाही. त्यानंतरही करिअरच्या विविध मोठ्या संधी उपलब्ध असतात. अनेक पालक मुलावर कमी गुण मिळाल्यामुळे राग काढतात. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते डिप्रेशनमध्ये जातात. मात्र निकालाचे नैराश्य टाळून भविष्यात योग्य करिअर घडवता येवू शकते.

ही वस्तुस्थिती स्वीकारा आणि निकालाचे नैराश्य टाळा –

सर्वात आधी निकालाची वस्तुस्थिती स्वीकारा. खचून जावू नका. केवळ दहावी आणि बारावी म्हणजे सर्व काही नाही. तुम्हाला मिळालेले गुण खरंच योग्य आहेत की नाही हे आधी तपासून पाहा. जर निकालाबद्दल शंका असेल तरच निकाल रिचेकिंगला पाठवा.

विशिष्ट कॉलेजमध्ये अँडमिशन हवी आहे असा हट्ट धरू नका; दुसर्‍या कॉलेजला जाण्याचीही तयारी ठेवा. तसेच पर्यायी कोर्ससाठी अँडमिशन घेण्याची तयारी ठेवा.

तुम्ही निकाल बदलू शकत नाहीत. बारावी / ग्रॅज्युएशननंतर देखील अनेक करिअरचे पर्याय/मार्ग आहेत. मात्र योग्य प्लॅनिंगमुळे व मेहनतीमुळे तुम्ही चांगले करिअर बनवून तुमचे भविष्य बदलू शकता हे लक्षात असू द्यात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु