संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अर्थरायटीसचे (संधिवात) रुग्ण जेवणामध्ये काही पदार्थांचा समावेश करून होणारा त्रास कमी करू शकतात.खाद्यपदार्थांमुळे संधिवात मुळापासून नष्ट्र केला जाऊ शकत तसला तरी स्थितीत चांगली सुधारणा घडवू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. असे कोणते खाद्यपदार्थ आहेत जे संधिवाताच्या रूग्णांसाठी खूप फायदेशिर ठरू शकतात, याविषयी आपण माहिती करून घेणे गरजेचे आहे.संधिवाताने पीडित असल्यास सांधेदुखी, हाडांमधून आवाज येणे आणि वजन अनियंत्रित होणे यासारखे त्रास होतात. या तक्रारी दूर करण्यासाठी योग्य आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. हा त्रास ज्यांना आहे त्यांनी सांधे आणि हाडांना मजबुती देणाऱ्या  खाद्यपदार्थांचा समावेश आहारात केल्यास लवकरच आराम पडू शकतो. कोणत्या खाद्यपदार्थांमुळे सांधेदुखीच्या आजारात आराम पडतो, याची माहिती आपण घेणार आहोत. एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमधील ओलिओकेंथेल नावाचा घटक एंझाइम्सला ब्लॉक करतो. एंझाइम्समुळे सांध्याला सूज येते. मात्र, या ऑलिव्ह आइलमुळे सूज ओसरते.

जेवणात तीन चमचे ऑलिव्ह ऑइलचा वापर ब्रुफेमच्या एक दशांश भागाच्या समान काम करते. ऑलिव्ह ऑइल कॅलरी फ्री नसले तरी मर्यादित प्रमाणात याचे सेवन करता येते. एक चमचा ऑलिव्ह ऑइल सॅलड किंवा भाजीमध्ये वापरल्यास चांगला लाभ होतो, असे फिलाडेल्फिया येथील मोनेले केमिकल सेंसेज सेंटरच्या एका संशोधनात दिसून आले आहे.शिमला मिरची आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांमध्ये भरपूर क जीवनसत्त्व असते. हे क जीवनसत्त्व कोलेजनला सुरक्षित ठेवते. जेवणात या जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास संधिवात पीडिताचा त्रास आणखी वाढू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. कॅनडात संधिवात ग्रस्त १३१७ पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जे लोक जेवणात १५०० मिलीग्रॅम क जीवनसत्त्व दररोज समाविष्ट करतात त्यांचा त्रास ४५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे दिसून आले. जे लोक पुरेसे क जीवनसत्त्व घेत नाहीत त्यांना जास्त त्रासाचा सामना करावा लागतो. २००-५०० मिलीग्रॅम क जीवनसत्त्वाने सुरुवात करा.

एक संत्र व एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.तसेच कांद्यात असलेले क्यूर्सेटिन नावाचे अँटिऑक्सिडंट सूज वाढवणाऱ्या रसायनाची सक्रियता थांबवते. हाच त्रास थांबवण्यासाठी अ‍ॅस्प्रिन आणि ब्रुफेम यासारखे औषधेही काहीजण घेतात.कांद्याच्या सेवनाने संधिवाताच्या रुग्णांना आराम पडतो. ज्यांना कांदा आवडत नाही त्यांनी टोमॅटो किंवा सफरचंदाचे सेवन केले तरी चांगला लाभ होतो. सॅलडमध्ये कांदा वापरता येतो अथवा भाजी बनवताना त्यात कांदा टाकावा. तसेच माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मोठ्याप्रमाणात असते. हे अ‍ॅसिड सूज वाढवणाऱ्या रसायनांची सक्रियता थांबवते. शिवाय माशांमध्ये असलेल्या ड जीवनसत्त्वामुळे सुद्धा सूज आणि वेदना कमी होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु