कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही मोठी माणसे कमी झोप घेतात. सकाळी लवकर उठतात, असे आपण पुस्तकांमध्ये वाचतो. मात्र, त्यांची नक्कल करणे आपणास महागात पडू शकते. कमी झोप घेतल्यामुळे माणसे मोठी होतात, असे कुठेही म्हटलेले नाही. शरीराला पूर्ण झोप मिळालीच पाहिजे. उलट कमी झोप घेतल्यास तुम्हाला विविध आजारांना तोंड द्यावे लागेल. अमेरिकेतील नागरिक रात्री सरासरी ७ तास झोपतात.अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने सांगितलेल्या तासांपेक्षा हे प्रमाण कमी आहे.

एका संशोधकात अभ्यासकांनी ४ तास झोप घेणाऱ्या आणि ६ तास झोप घेणाऱ्यांच्या संज्ञानात्मक कार्यात प्रदर्शन आणि रिअ‍ॅक्शन टाइम कसा राहिला याची नोंद घेतली. आणखी एका संशाधनात असे आढळून आले की, ६ दिवस सतत प्रत्येक रात्री ४ तास झोप घेतलेल्या लोकांमध्ये स्टड्ढेस हार्मोन कॉर्टिसोल अधिक आढळले. त्यांचे ब्लड प्रेशर वाढले आणि अ‍ँंटीबायोटिकही कमी आढळून आली. रात्री ८ तास झोप घेतल्यावरही सकाळी ४ वाजता उठल्यास त्रास होणार नाही, हे देखील चूकीचे आहे. कारण किती वेळ झोप घेतली याने काहीही फरक पडत नाही. जास्तीत जास्त लोकांचे शरीर सकाळी ४ वाजता उठण्याच्या स्थितीत नसू शकते. असे असताना शरीराशी छेडछाड करणे त्रासदायक होऊ शकते.

शरीरातील इंटरनल बॉडी क्लॉकला लवकर किंवा उशीर केला. तर या दोन्ही स्थितींत झोप पूर्ण न झाल्यावर वाटते. बॉडी क्लॉक मेंदूला संकेत पाठवते की, कधी स्लीप हार्मोन मेलाटोनिन रिलीज करायचे आहेत. अशा वेळी मेंदू मेलाटोनिन हार्मोन रिलीज करत असल्यास आणि व्यक्तीने जबरदस्तीने उठण्याचा प्रयत्न केल्यास झोप येत राहणार. एनर्जी कमी जाणवेल आणि मूडही चांगला राहणार नाही. म्हणून कुणाचीही नक्कल करण्यापेक्षा आपल्या शरीराचे ऐकणे कधीही चांगले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक दररोज सकाळी ४ वाजता उठतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प रात्री केवळ ४ तास झोप घेतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी दररोज सकाळी ४ वाजता जिममध्ये पोहोचतात. या हायप्रोफाइल व्यक्तींची नक्कल कधी करू नये. आपले शरीर जे सांगते तेच ऐकले पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु