भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

आरोग्यनामा ऑनलाइन – भात जास्त खाल्ल्याने वजन वाढते असा सर्रास समज आहे. त्यामुळे अनेकजण जेवणात खूप कमी भात खातात. भाकरी, चपाती या पदार्थांचे अधिक सेवन करतात. मात्र खरोखरच भात खाल्ल्याने वजन वाढते का? यास काही शास्त्रीय आधार आहे का? असे प्रश्न पडतात. काहीजण भात बनवताना, फ्राय करताना जास्त तेल किंवा तुप टाकतात. यामुळे तांदळातील कॅलरीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळावेत यासाठी भात योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास भातामुळे वजन वाढणार नाही उलट कमी होऊ शकते.

भात तेल किंवा तूप न टाकता बनविल्यास कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन वाढणार नाही. भात आवडत्या भाज्यांसोबत बनवावा. भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. वजन सहज कमी होते. पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन तांदूळ खावेत. ब्राऊन राईसमध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त फायबर्स, कमी कॅलरी असतात. तांदळासोबत इतर डाळी मिक्स करून खिचडी बनवावी. यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात.

तांदूळ डाळ किंवा राजमासोबत खावेत. या पदार्थांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असल्याने वारंवार भूक लागत नाही. आणि वजन कमी होते. भात एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नये. वजन कमी करायचे असेल तर भाताचे पाणी काढून ते खाणे चांगले. यामुळे भातामधील आवश्यक न्यूट्रियंट्स निघून जातात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु