रोज प्यावे जिरे आणि गुळाचे पाणी, होतील ‘हे’ १० फायदे, अवश्य जाणून घ्या

रोज प्यावे जिरे आणि गुळाचे पाणी, होतील ‘हे’ १० फायदे, अवश्य जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जिरे आणि गुळाचे पाणी शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने अनेक आजार दूर राहतात. यातील विविध औषधी गुणधर्मामुळे आरोग्य चांगले राहते. या पाण्यात आयर्न जास्त असल्याने रक्ताची कमतरता दूर होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. हे पाणी तयार करण्यासाठी भांड्यात एक ग्लास पाणी, एक चमचा जिरे आणि थोडा गुळ टाकून उकळून घ्या. गार झाल्यानंतर नाष्ट्यापूर्वी प्यावे. यामुळे आरोग्याचे दहा फायदे होतात. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.

चमकदार त्वचा
हे प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते, आणि त्वचा चमकदार होते.

डायजेशन
जिरे आणि गुळाचे पाणी अ‍ॅसिड लेव्हल कमी करून डायजेशन व्यवस्थित करते.

कमजोरी
यातील आयर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते. यामुळे थकवा, कमजोरी दूर होते.

अ‍ॅनिमिया
यातील आयर्नमुळे रक्ताची कमतरता भरून निघते. यामुळे अ‍ॅनिमियासारखा आजार होत नाही.

दमा
यातील अँटीबॅक्टिरियल गुणांमुळे दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो.

सर्दी-पडसे
हे गरम असल्याने सर्दी-पडसे होत नाही.

प्रतिकारक शक्ती
हे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार होत नाहीत.

लिव्हर प्रॉब्लेम
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत.

ताप
हे पाणी प्यायल्याने शरीराला गारवा मिळतो आणि ताप उतरतो.

अंगदुखी
हे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण चांगले होऊन मसल्सला आराम मिळतो. यामुळे अंगदुखी होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु