वयाची चिंता नको, पन्नाशितील ‘या’ ५ कलाकारांकडून घ्या प्रेरणा…रहा फिट

वयाची चिंता नको, पन्नाशितील ‘या’ ५ कलाकारांकडून घ्या प्रेरणा…रहा फिट

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  चाळीशी ओलांडली की, प्रत्येकाला काळजी वाटते ती आपल्या आरोग्याची. परंतु, योग्य आहार घेतला आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला पन्नाशीनंतरही आरोग्याची काळजी वाटणार नाही. बॉलिवुडमधील काही कलाकार हे पन्नाशीतही फिट असल्याचे दिसते. या कलाकारांकडून प्रेरणा घेतली तर तुम्ही पन्नाशीतही फिट राहू शकता.

यांच्याकडून घ्या प्रेरणा
आमिर खान
पन्नशीनंतरही अभिनेता अमिर खान फिट आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार या गोष्टी सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे ५४ वर्षीय अमिर म्हणतो.

शाहरुख खान
शाहरुख खानच्या यंग लुकचे रहस्य संतुलित आहार हे आहे. तो दोन दशकापासून प्रशांत सावंत नावाच्या ट्रेनरच्या हाताखाली ट्रेनिंग घेतोय. त्याने वयाच्या ५३व्या वर्षीही अ‍ॅब्स कायम ठेवले आहेत. आठवड्यातून ५ दिवस तो व्यायाम करतो. १ तास २० मिनिटे त्याचा व्यायाम चालतो.

मंदिरा बेदी
मंदिरा बेदीचा लुक वयाच्या ४५ वर्षांनंतरही चार्मिंग आहे. ती नियमित जिम तर करते. स्विमिंग, धावणे असे प्रकार करते. आजही तिची बॉडी एकदम फीट आहे.

सलमान खान
वयाची पन्नाशी ओलांडली तरी सलमान खान अजूनही तरुण दिसतो. शेड्युल्ड व्यस्त असले तर तो रात्री २ वाजता उठून व्यायाम करतो. तो दिवसाला ४ अंडी खातो, तसेच दूध, ५ चपात्या, फळे, मांसाहार घेतो.

माधुरी दिक्षित
माधुरी दिक्षितने पन्नाशी ओलांडली असली तरी ती तरूण दिसत आहे. कथ्थक, योगा आणि खेळ हे तिच्या तारुण्याचे रहस्य आहे.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु