तोंडाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, असू शकतो कँसर

तोंडाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, असू शकतो कँसर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दारु, तम्बाखूचे सेवन केल्यामुळे हा कँसर होण्याची शक्यता असते. परंतु योग्य वेळी निदान झाले तर कँसरवर उपचार केले जाऊ शकतात. अनेक वेळा कँसरच्या लक्षणांकडे दुर्लंक्ष केले जाते. यामुळे ही समस्या गंभीर स्वरुप घेते आणि जीवघेणी ठरते. या आजाराच्या काही लक्षणांविषयी जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे

गाठ येणे
तोंडाच्या आतील भागात जाडसर असलेली लहान आकाराची गाठ आली असेल तर ते तोंडाच्या कँसरचे लक्षण असू शकते.

संवेदना कमी होणे
तोंडाच्या आतील भागात बधीरपणा येणे अथवा संवेदना न जाणवणे हे देखील तोंडाच्या कँसरचे लक्षण आहे.

वेदनादायक फोड व चट्टे
तोंडामध्ये वेदनादायक फोड व चट्टे हे ओरल कॅन्सरचे प्रारंभिक लक्षण आहे. पुढे हा विकार वाढू लागल्यास या फोडांमधील वेदना असह्य होतात. अनेक वेळा अन्न खाताना हे फोड फुटतात व त्यातून रक्तस्त्राव होतो

ओठ व हिरड्यांचा त्रास
ओरल कॅन्सर मुळे ओठ व हिरड्यांच्या पृष्ठभागावर दुखापत होते ज्यामुळे त्या भागातील टिश्यूज नष्ट होतात.

दात तुटणे व दुर्गंध येणे
काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून येतात. हिरड्या दुखावल्या गेल्यामुळे दात तुटणे व दुर्गंधी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

बोलण्यास अडचण येणे
तोंडातील कर्करोग घशामध्ये पसरतो त्यामुळे रुग्णाला बोलण्यास त्रास होतो. ओरल कॅन्सरमुळे रुग्णाचा आवाज देखील बदलतो.

वजन कमी होणे
अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे सामान्य लक्षण आढळते. ओरल कॅन्सरमध्ये अन्न गिळताना त्रास होत असल्यामुळे त्या रुग्णाचे वजन कमी होते.

लाल, पांढरे चट्टे येणे
जर तोंडामध्ये अथवा घशामध्ये लाल अथवा पांढरे जाड व त्रासदायक चट्टे असतील व ते दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाल्यावर देखील बरे होत नसतील तर ते ओरल कॅन्सरचे प्रमुख लक्षण असू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु