तुम्हाला खुप घाम येतो का ? मग करा हे 8 सोपे घरगुती उपाय, त्रासातून व्हाल मुक्त

तुम्हाला खुप घाम येतो का ? मग करा हे 8 सोपे घरगुती उपाय, त्रासातून व्हाल मुक्त
आरोग्यनामा ऑनलाइन – अनेकांना उष्णता अजिबात सहन होत नाही. थोडावेळ जरी उन्हात गेल्यास घाम येतो. कपडे, चेहरा, हात, पाय, ओले होतात. असा त्रास होत असल्यास यावर अतिशय सोपे आणि घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास या त्रासातून सहज मुक्त होऊ शकता. या समस्येवर कोणते उपाचार करावे, याविषयी सविस्तर माहिती घेवूयात.

हे उपाय करा

बटाट्याचा तुकडा कापून तो काखेत आणि जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी रगडल्यास घाम येत नाही. हा सर्वात सोपा उपाय आहे.

जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी थोडासा बेकिंग सोडा लावा. या उपायाने घाम आणि घामामुळे येणारी दुर्गंधी येणार नाही.

दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घेतल्याने घाम कमी येतो. यातील अँटीऑक्सीडेंट असून हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते. यामुळे शरीराला थंडावा सुद्धा मिळतो.

एक चमचा मीठ लिंबाच्या रसामध्ये मिसळून हातावर मळून घ्या. हे मिश्रण घाम सोडत असलेल्या ग्रंथीची गती मंद करते.

हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद यामध्ये मॅग्नेशियम असल्याने त्याचे सेवन करावे.

भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू-पाणी आणि हर्बल टी सुद्धा घ्या.

दरोज द्राक्ष खावीत. यामुळे जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.

दहा ग्रॅम कापूर नारळाच्या तेलामध्ये टाकून हे तेल जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु