तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्यक्ती मानसिक तणावाखाली असली की तिच्या हालचाली वेगळ्या दिसून येतात. काही लोक तणावखाली असताना ज्या गोष्टी करतात ते पाहून कुणीही त्या तणावाखाली आहेत, हे ओळखू शकते. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने या गोष्टी, सवयी अथवा हालचाली घातक असतात. नखे खाणे, बोटे मोडणे, पायांना क्रॉस करणे या सर्व गोष्टी सामान्य वाटत असल्या तरी त्याचे अनेक दृष्परिणाम होऊ शकतात.

काही लोक चिंताग्रस्त झाल्यावर पाय क्रॉस करतात. तर काही जण एकाच पायावर भार देऊन उभे राहतात. पाय क्रॉस करून बसल्याने सर्व भार नितंबावर येतो. यामुळे त्रास होऊ शकतो. हिप्ससंबंधित मंज्जारज्जूतून पायाकडे करणारी प्रणाली आखडते आणि रक्त पुरवठा प्रभावित होण्याचा धोका वाढू शकतो.

तसेच काही व्यक्तींना भीती वाटू लागल्यावर चेहऱ्यावर हालचाल झाल्याचा भास होतो. अशावेळी ते वारंवार चेहऱ्याला हात लावतात. किशोरावस्थेत ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात. यामुळे त्वचेवरील रंद्रे झाकली जाण्याचा आणि मुरम येण्याचा धोका असतो. ज्या लोकांना मुरमे आहेत त्यांना अशा सवयीमुळे ती अन्य ठिकाणी संक्रमित होण्याची शक्यता वाढते. तसेच नखे कुरतडणे किंवा चावण्याची सवय प्रत्यक्षात लाजाळू किंवा नैराश्याशी संबंधित आहे. सार्वजनिक ठिकाणी ही सवय जास्त बळावते. या सवयींमुळे नखे आणि दातांवर वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे नखांच्या कोऱ्याना जखमा होण्याची तसेच बोटाच्या बाजूला सुज येण्याचा धोका असतो. नखाखाली जखम झाल्यास त्यात पू होऊ शकतो.

अनेक लोक जास्त चिंताग्रस्त झाल्यावर बोटे मोडतात किंवा टिचकी वाजवण्याचा प्रयत्न करतात. या सवयीमुळे बोटांना जोडणाऱ्या सांध्यांवर दबाव वाढतो. परिणामी बोटांच्या जोडांमध्ये असणाऱ्या नाजूक पेशी दुखावण्याची शक्यता असते. तसेच या सवयीमुळे बोटांची पकड कमी होत जाते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु