रक्त शुद्धीकरणासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

रक्त शुद्धीकरणासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहारासह काही चूकीच्या सवयींमुळे तसेच प्रदुषणाच्या समस्यांमुळे शरीरात विषारी घटक वाढतात. यामुळे अशुद्ध रक्ताची समस्या निर्माण होते. यानंतर विविध प्रकारचे शारीरीक त्रास सुरू होताता. रक्त हा शरीरातील मुख्य घटक असल्याने रक्त अशुद्ध झाल्यास शरीरावर त्याचे परिणाम ताबडतोब दिसू लागतात. शिवाय, हे परिणाम गंभीर असू शकतात. अनेकदा हे परिणाम जीवघेणेही ठरू शकतात. यासाठी रक्तशुद्धी महत्वाची आहे. त्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण आणि अवयवांची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. यासाठी फायदेशीर खाद्यपदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे.

अनहेल्दी फूड, मलावरोध, तणाव, दूषित पाणी, चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन किंवा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने शरीरात विषारी घटकांची पातळी वाढते. यामुळे शरीराच्या अवयवांची कार्यप्रणाली बाधित होऊन विविध प्रकारची अँलर्जी, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, डोकेदुखी किंवा थकवा येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे. लसूण नैसर्गिक रक्त शुद्ध करणारे असून अँटिबायोटिकही आहे. लसणामुळे रक्तात फॅटचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. यामुळे चेर्हयावर फोड आणि तारुण्यपीटिका येत नाहीत. पत्ताकोबी, फुलकोबी आणि कांद्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स अंतर्गत अवयवांवर होणारे विषारी घटकांचे परिणाम कमी करतात.

रक्तशुद्धीसाठी जेवणात काळे मिरे वापरणे लाभदायक आहे. यामुळे हायड्रोक्लोरिक अँसिड सक्रिय होते आणि पचनक्रियाही चांगली राहते. सफरचंद, अननस, नासपाती, किवी, संत्रा आणि कलिंगड यांसारखी फळे रक्त शुद्ध करतात, त्यामुळे त्यांचे भरपूर सेवन करावे. दररोज फळ आणि भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या ज्यूसचे सेवन करावे. किडनी आणि आतड्यांच्या सफाईसाठी गाजर, बीट, सफरचंदाचा रस आणि लिंबू-पाणी उपयोगी आहे.

रक्तशुद्धीसाठी कोणते पदार्थ खावेत
* यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.
* पत्ताकोबी, फुलकोबी आणि कांदा.
* रक्तशुद्धीसाठी जेवणात काळे मिरे वापरणे.
* सफरचंद, अननस, नासपाती, किवी, संत्रा, कलिंगड ही फळे खावीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु