मोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर

मोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थंड वातावरण असताना मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात किंवा औषधाच्या रुपात करणे लाभदायक ठरते. यातील विविध पोषकतत्त्वांमुळे आरोग्य, केस आणि त्वचा चांगली राहते. मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. विशेष म्हणजे मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. या तेलाचे काही रामबाण उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत उपाय

मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्त वाढते. शरीरात स्फूर्ती येते.

मोहरीच्या तेलात मीठ टाकून दात आणि हिरड्यांवर चोळल्याने दात मजबूत राहतात. हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होते.

पायांच्या तळव्यांवर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास डोळ्यांची कमजोरी दूर होते.

त्वचेच्या रोगांसाठी मोहरीच्या तेलामध्ये धोतरा या वनस्पतीच्या पानांचा रस आणि हळद टाकून गरम करा. हे थंड झाल्यावर योग्य त्या ठिकाणी लावा. यामुळे डाग, खाज, रॅशेश दूर होतील.

ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकूत्या असल्यास मोहरीच्या तेलाने मालिश करा.

मोहरीच्या तेलात थोडी हिना पावडर टाकून काही वेळ उकळा, नंतर हे गाळून केसांना लावा, केस गळती दूर होते.

मोहरीच्या तेलात वेदनाशामक गुण असल्याने कान दूखत असेल तर दोन थेंब मोहरीचे तेल कानात टाका.

रुप आणि सौंदर्य उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीमध्ये मोहरीचे तेल टाकून लावा.

मोहरीचे तेल हृदयरोगावर गुणकारी आहे.

१० संधिवातात मोहरीच्या तेलात कापूर टाकुन मालिश करा. वेदनेपासुन आराम मिळेल.

११ कंबरदुखी असल्यास मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे हींग, ओवा आणि लसुन टाकून गरम करा आणि ते कंबरेला लावा.

१२ नवजात शिशु आणि त्याची आई दोघांचीही मालिश करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर अंघोळ घातल्याने शिशुला सर्दी होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु