छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’

छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या रासायनिक खतांचा वापर करून भाज्याच पिक घेतलं जात आहे. या भाज्यांच्या सेवनाने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यातीलच एक आजार म्हणजे छातीत दुखणे किंवा चमक निघणे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये या आजार जास्त तोंडवर काढत आहे. कारण एकतर आपली झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते. आणि ऍसिडिटीमुळेही छातीत चमक निघू शकते. परंतु, छातीत वारंवार चमक निघण्याला अजूनही एक कारण असू शकत.

छातीत वेदना होण्याची कारणे पुढीलप्रमाणे 

१) छातीत वेदना होण्याचं मुख्य कारण म्हणजे ऍसिडिटी कारण खूपदा ऍसिडिटीमुळेही आपल्या छातीत चमक निघू शकते. अपुरी झोप अवेळी जेवण यामुळे ऍसिडिटी होते. आणि छातीत चमक निघते.

२) कधी-कधी हृदयाच्या स्नायूंना व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यानेही आपल्या छातीत चमक निघू शकते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे छातीत चमक निघत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

३) कोणत्याही कामाचा जास्त तणाव घेतला. किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केला तर त्यामुळेही आपल्या छातीत चमक निघू शकते. यासाठी आपण नेहमी आनंदी राहायला हवं.

४) कधी-कधी खूप कष्टाचं काम केल किंवा सायकल फास्ट चालवली तर छातीत चमक निघते.

५) छातीत चमक निघणे हा हार्ट अटॅक लक्षण असू शकत.

ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणे 

१) अस्वस्थ वाटणे

२) मळमळ होणे

३) छातीत चमक निघणे

४) दम लागणे

५) पोटात दुखणे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु