‘डायरीया’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, लवकर येईल ‘गुण’ !

‘डायरीया’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, लवकर येईल ‘गुण’ !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डायरीया हा आजार विविध कारणांमुळे होतो. खाण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ किंवा अरोग्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे डायरीया होतो. यामध्ये लूज मोशनमुळे शरीरातील मिनरल्स आणि पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन अशक्तपणा येतो. वारंवार होणारे जुलाब थांबवण्यासाठी अ‍ॅलोपॅथीकऐवजी घरगुती उपाय लाभदायक ठरतात. डायरीयावर काही घरगुती उपाय असून त्याची माहिती आपण घेणार आहोत.

कारणे / लक्षणे
फूड पॉइझनींग, इन्फेक्शन, खाद्य पदार्थाची अ‍ॅलर्जी, गरजेपेक्षा जास्त आहार घेणे, शरीरातील पाणी कमी होणे, ही डायरीयाची कारणे आहेत.
ताप येणे, अचानक वजन कमी होणे, ही डायरीयाची लक्षणे आहे.

हे घरगुती उपाय करा

* लिंबामध्ये अँटी इंफ्लोमेट्री प्रॉपर्टीज असतात. यामुळे पोट साफ होते. यामुळे डायरीयापासून आराम मिळतो. एका लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मीठ टाकून ते पाण्यासोबत घ्यावे. हा उपाय करताना हलका आहार घ्यावा.

* डाळींबामुळे डायरीया लवकर बरा होतो. डाळींबाच्या  बीयासुद्धा डायरीयावर गुणकारी आहेत. दिवसातून कमीत-कमी एक ते दोन वेळा डाळींबाच्या  ज्यूसचे  सेवन करावे.

* मेथीमध्ये अँटिबॅक्टिरियल  प्रॉपर्टीज असतात. एक चमचा मेथीदाण्यांची पावडर थंड पाण्यासोबत घ्यावी. यामुळे पोटातील उष्णाता कमी होते. उपाशी पोटी मेथीदाण्यांची पावडर दोन-तीन दिवस घेतल्यास आराम मिळतो.

* डायरियावर मध हा रामबाण उपाय आहे. लूज मोशन होत असताना दिवसातून दोन ते तीन चमचा मध खावी. एक चमचा मधासोबत अर्धा चमचा दालचीनी पावडर घेतल्यानंतर जुलाबाचा त्रास बंद होतो.

* जुलाबाचा त्रास होत असल्यास कच्ची पपई गुणकारी आहे. कच्ची पपईचे छोटे-छोट तुकडे करून उकळून घ्यावेत. हे पाणी उकळून घ्यावे. पपईच्या पाण्यामुळे जुलाब बंद होतात. हे पाणी दिवसातून दोन-तीन वेळा प्यावे.

* पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी भोपळा लाभदायक ठरतो. भोपळ्याचा रस घेतल्यानंतर डायरीया बरा होतो. जुलाबचा त्रास बंद होतो. एक ग्लास ताकामध्ये थोडे मीठ टाकावे, जीरे आणि हाळद टाकून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण लाभदायक ठरते.

* बेलाची पाने किंवा फळे जुलाब होत असल्यास गुणकारी ठरतात. २५ ग्रँम बेलाची पावडर मधामध्ये मिसळून प्यावी. हा उपाय केल्यास लवकर आराम मिळतो.

* शिजवलेले तांदुळ दह्यासोबत घेतल्यांनतर जुलाबाचा त्रास होत नाही.

* अदरकमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टिरियल घटक असल्यामुळे डायरीयासाठी लाभदायक आहे. अर्धा चमचा अदरक पावडर ताकामध्ये मिक्स करून घ्यावी. हे मिश्रण सेवन केल्यानंतर डायरीया बरा होतो.

* मोहरीमध्ये अँटीबॅक्टीरीयल गुण असल्याने डायरीयासाठी मोहरी रामबाण उपाय ठरते. एक कप पाण्यामध्ये एक तास मेहरीच्या बिया भिजत ठेवाव्यात. एक तासानंतर हे पाणी गाळून सेवन करावे. दिवसातून दोन ते तीन वेळा मोहरी भीजवलेले पाणी प्यायल्यांनतर डायरीया बरा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु