मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कुठे प्रवास करत असताना किंवा काही काम करत असताना आपला अपघात होतो. अपघात झाल्यावर लगेच हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण त्यावर काही घरगुती उपाय शोधत असतो. आपल्याला अनेक जण वेगवेगळे सल्ले देत असतात. त्यांचे ऐकून आपण त्या मोडलेल्या हाडावर घरगुती उपाय करत असतो. मग शेकवण असेल किंवा त्याच्यावर काही गरम तेल वगैरे टाकतो. मात्र तुम्ही केलेले हे उपाय अतिशय चुकीचे आहेत. कारण त्यामुळे त्या मोडलेल्या हाडाला इजा होऊ शकते.

१) मोडलेल्या हाडावर आपण तेल करून टाकतो. कारण आपल्याला वाटते गरम तेलाचा शेक दिल्याने हाड लवकर बर होईल. मात्र असे केल्याने हाड अजून सुजते.

२) मोडलेल्या हाडाला किंवा मुरगळलेल्या ठिकाणी आपण गरम वस्तूंनी शेक देतो. पण हे करणे अगदी चुकीचे आहे.

३) तुम्ही हाडाला व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला एका कापडाची पट्टी कापून तिने ते हाड व्यवस्थित बांधा. असे केल्यास तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

४) हाडाला ज्या ठिकाणी सूज आली आहे. त्याठिकाणी थंड पाणी किंवा बर्फ टाकत राहा. तुम्हाला आराम मिळेल.

५) तुमच्या मोडलेल्या हाडाचा रोज सहन होईल तितका व्यायाम करत राहा. यामुळे ते आखडले जाणार नाही. आणि तुम्हाला त्रास होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु