‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण

‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ड जीवनसत्त्व  कोवळ्या उन्हामध्ये  विपुल प्रमाणात असते. मात्र तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ड जीवनसत्त्वे नसल्यास आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. जाणून घ्या ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे रोग

 1) मुदूस हा ‘’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.

2) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्नायूंचे दुखणेही जडते.

3) सतत थकल्यासारखे वाटते.  कोणताही  आजार नसताना अशक्तपणा जाणवतो.

4) ड जीवनसत्त्वाची कमतरता लहान मुलांनाही जाणवते. ती सतत मरगळलेली आढळतात.

5) ड  जीवनसत्त्वाची कमतरता ही खरे तर लहानपणापासूनच सुरू होते, पण आपल्याकडे साधारण पन्नाशीनंतर त्याचे परिणाम जाणवू लागतात.

6) रक्तदाब नियमित ठेवण्यात तसेच, हृदयाच्या स्नायूंच्या पेशींची योग्य ती वाढ होण्यातही ड जीवनसत्वाचा मोलाचा वाटा असतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हृदयविकार व धमन्यांचे आजार उद्भवू शकतात.

7) ड जीवनसत्वाच्या पातळीचा धमन्यांच्या आतील भागातील मऊ स्नायूंवर थेट परिणाम होतो. ड जीवनसत्व कमी असल्यास धमन्यांच्या भित्तिका कठीण बनतात व त्यातून सुयोग्य प्रमाणात रक्तपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो.

8) अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग यांसारखे रोग होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु