सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – सौंदर्य प्रसाधनांच्या अति वापरामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. नेलपॉलिश, हेअर स्प्रे आणि परफ्यूममध्ये थॅलेटससारखे हानिकारक केमिकल असते. हे केमिकल शुगर वाढवणे आणि इन्सुलिनच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरतात. अशा वस्तूंपासून लांब राहणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, हे ब्रिंघम अँड वुमेन्स हॉस्पिटल्स डिव्हिजन ऑफ वुमेन हेल्थच्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

मधुमेह असणाऱ्या रूग्णाने आरोग्याची खुप काळजी घेणे खुप आवश्यक असते. डॉक्टर तसे रूग्णांना सांगतात सुद्धा. मात्र, अनेकदा रूग्ण या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मधुमेहाचे प्रमाण वाढून रूग्णाची प्रकृती गंभीर होते. शिवाय, शरीराच्या एखाद्या महत्वाच्या अवयवाचे मोठे नुकसान होते. मधुमेहावर कोणकाणत्या सवयींचा परिणाम होतो याबाबत संशोधकांचे सातत्याने संशोधन सुरू आहे. यासंदर्भात ब्रिंघम अँड वुमेन्स हॉस्पिटल्स डिव्हिजन ऑफ वुमेन हेल्थने केलेल्या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, सौंदर्य प्रसाधनांच्या अति वापरामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. नेलपॉलिश, हेअर स्प्रे आणि परफ्यूममध्ये थॅलेटससारखे हानिकारक केमिकल असते. हे केमिकल शुगर वाढवणे आणि इन्सुलिनच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सौंदर्य प्रसाधनांपासून मधुमेह असणाऱ्या महिलांनी दूर राहिले पाहिजे.

मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होऊ लागतात. तसेच त्वचा कोरडी होणे, केस गळणे अशा समस्या वाढतात. अशावेळी स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मेधुमेहाशी संबंधीत संबंधित नर्वस आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्याने रक्तसंचारण संथ होऊ लागते. परिणामी पायातील संवेदना कमी होत जातात. यामुळे रूग्णाच्या पायाला एखादी जखम किंवा दुखापत झाल्यास ती लगेच कळत नाही आणि लवकर बरी होत नाही.

म्हणून पायांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मधुमेही व्यक्तीच्या शरीराची किटाणूशी लढण्याची क्षमता कमी झालेली असते. अशा स्थितीत दातांमध्ये प्लाकनिर्मिती होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी दरवर्षी दातांची क्लीनिंग अवश्य करावी. डेंटिस्टच्या भेट घेण्याच्या कल्पनेनेच मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखरेचा स्तर वाढतो. यासाठी डेंटिस्टकडे जाण्यापूर्वी नाश्ता करून औषध घ्यावे. तसेच डायबिटीसमुळे त्वचा सैल होणे आणि केस गळण्याची समस्या होते. रक्ताभिसरण चांगले व्हावे यासाठी शरीर आणि डोक्याची मालिश करावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु