पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्यायामाचा अभाव व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे अनेकांच्या पोटाची चरबी वाढत आहे. ही पोटाची चरबी सौंदर्यात बाधा तर आणतेच शिवाय अनेक आजरांना निमंत्रणही देते. वाढलेला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर काही आयुर्वेदिक चहाचे सेवन करू शकता. आयुर्वेदिक मसाल्यांमध्ये अनेक अँटी -ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीराचं मेटाबॉलिज्म वाढवतात. त्यामुळे पोटाची चरबी व घेर कमी होतो.

१) दालचिनीचा चहा
साहित्य – १ लीटर पाणी, दालचिनीची काडी किंवा ५ लहान चमचे दालचिनी पावडर, अर्धा चमचा मध
कृती- एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून पाच मिनिटासाठी उकळवा. हा चहा गार झाल्यानंतर यात मध मिसळा.
दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

२) जिर्‍याचा चहा
साहित्य – पाणी , जिरं, मध किंवा लिंबू
कृती – गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात मध किंवा लिंबाचा रस घालून प्यावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

३) तुळशीच्या पानाचा चहा
साहित्य -चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीची पाने
कृती – गरम पाण्यात गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीची पाने मिसळून उकळावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

४) आल्याचा चहा
साहित्य – पाणी, आलं , तुळशीची पाने, मध
कृती – आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. गाळल्यानंतर त्यात मध घालून प्या.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

५) पुदिना चहा
कृती – गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

६) लेमन टी
साहित्य – लिंबू, चहापत्ती,
कृती – पाण्यामध्ये चहापत्ती टाकून उकळावा. गळाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून सेवन करावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

७) ग्रीन टी
कृती – एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. दोन मिनिटानंतर काढून सेवन करावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

८) काळ्यामिर्‍याचा चहा
साहित्य – काळेमिरे , पाणी, लिंबू किंवा मध ,
कृती – काळे मिरे आणि आल्याला पाच मिनिटापर्यंत पाण्यात उकळावे. गाळल्यानंतर मध किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु