कोलेस्टेरॉल दूर करतील ‘ही’ 7 पेये, टाळू शकता मधुमेहाचाही धोका

कोलेस्टेरॉल दूर करतील ‘ही’ 7 पेये, टाळू शकता मधुमेहाचाही धोका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध कारणांमुळे आपल्या शरीरात अनेक विषारी घटक तयार होत असतात. हे विषारी घटक शरीरात साचल्यास विविध आजार होऊ शकतात. हे विषारी घटक शरीरातून बाहेर पडणे आवश्यक असते. ते बाहेर काढण्यासाठी काही घरगुती उपाय असून हे उपाय केल्यास शरीर शुद्ध होऊन आरोग्य लाभू शकते. शरीरशुद्धीसाठी असलेल्या दहा पेयांविषयी आपण माहिती घेणार आहोत.

पपईचा ज्यूस
मध्यम आकाराच्या पपईचे तुकडे करून ब्लेंडरमध्ये टाका, यामध्ये २ चमचे ताज्या लिंबूचा रस, २ चमचे साखर किंवा मध, चिमुटभर मिरपुड आणि अर्धा कप पाणी टाकून ब्लेंड करा. चवीनुसार मीठ टाका, ज्यूस गार करुन तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता.

एलोवेरा ज्यूस
एलोवेराच्या ताज्या पानांमधील गर वेगळा करा. पिवळ्या रंगाचा थर वेगळा करा. तो घेऊ नका. आता हे सर्व मिश्रण २ मिनिटे मिक्सरमधून काढून घ्या. ग्लासमध्ये काढून यामध्ये पाणी आणि मीठ टाका.

गाजर-लिंबूचा ज्यूस
गाजर स्वच्छ करुन त्याचे तुकडे करा. यामध्ये १ चमचा साखर, ३-४ चमचे गार पाणी आणि किसलेले आले टाकून ब्लेंड करा. हे एक ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यामध्ये १ चमचा लिंबूचा रस मिसळा.

कोबी ज्यूस
एक कप कापलेला कोबी अर्धा कप पाणी टाकून ग्राइंड करा. प्यूरी करू नका. कोबीचे काही तुकडे दिसले पाहिजे. हा ज्यूस एका जारमध्ये प्लास्टिक रॅपने झाकून ३ दिवस रुम टेंपरेचरमध्ये राहू द्या. तयार झालेला ज्यूस गाळून ब्रेकफास्टमध्ये घ्या.

लिंबू पाणी
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक लिंबूचा रस टाकून त्यामध्ये चिमुटभर मीठ टाका. यामध्ये एक चमचा साखर किंवा मध टाकून सेवन करा.

अननस ज्यूस
ताज्या अननसाचे तुकडे ब्लेंड करा. हे साखर न टाकता गाळून प्या.

सफरचंद-मध ज्यूस
सफरचंदाचे साल काढून फ्रेश ज्यूस तयार करा. त्यामध्ये एक चमचा मध आणि चिमुटभर दालचीनी टाकून नाष्ट्यामध्ये घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु