‘ही’ काळजी घेतल्यास मुलांना लहान वयात चष्मा लागणार नाही

 
‘ही’ काळजी घेतल्यास मुलांना लहान वयात चष्मा लागणार नाही

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल लहान मुलांनाही चष्मा लागतो. आपण अनेकदा विचारही करतो. की लहान मुलांना नेमकं का चष्मा लागतो. पण याची कारणेही आपल्याच घरात असतात. कारण आज छोटा हॉल व मोठय़ा स्क्रीनचा टी.व्ही. सर्व घरांमध्ये पाहायला मिळतो. त्यातच सर्व मुलांकडे त्यांच्या आई-बाबांचा मोठय़ा स्क्रीनचा मोबाइल असतो, जो अनेकदा ते स्वत:च मुलांनी शांत बसावं म्हणून देतात, बाळ जन्मून काही तास होत नाही तोच त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी त्याच्यावर पर्यायाने त्याच्या डोळ्यांवर अनावश्यक फ्लॅशचा मारा होतो. त्यामुळे लहान मुलांना लवकर चष्मा लागतो.

लहान मुलांना लवकर चष्मा लागू नये म्हणून घ्या ही काळजी :

१) रोज आहारातील अतिप्रमाणात सेवन होणारे मीठ, लोणचं असे पदार्थ कमी करणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर दोन अथवा चार तासांनी डोळ्यांवर पाणी मारून डोळ्यांवर आलेला अनावश्यक ताण कमी करणे.

२) रोज सकाळी सूर्योदयानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये दोन-दोन थेंब देशी गाईचे साजूक तूप अल्प कोमट करून घालणे. नंतर सूर्याकडे पाहत थोडा वेळ उन्हामध्ये बसावे. काही क्षण पाहिल्यानंतर ५-१० मिनिटे डोळे बंद करून बसा.

३) लहान मुलांना डोळ्यात काजळ घाला. यामुळे त्यांच्या डोळ्याला त्रास होणार नाही. आणि लहान मुलांना चष्मा ही लवकर लागणार नाही.

४) लहान मुलांना अंधारात राहण्याची सवय लावा. तसेच रात्री झोपताना घरातील लाईट बंद करा. जेणेकरून त्यांच्या डोळयांना त्रास होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु