झोप येत नाही ? मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल

झोप येत नाही ? मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – शरीराला पूर्ण झोप न मिळाल्यास त्याचे विविध परिणाम ताबडतोब दिसून येतात. शिवाय आपल्या कामावरही त्याचा परिणाम होतो. झोपेअभावी दिवसभर मूड बिघडून जातो. थोडेसे थकल्यासारखे वाटते. चिडचिड होते. यामुळे शांत झोप मिळणे खूप गरजेचे आहे. आठतास झोपूनही जर शांत झोप लागली नसेल तर झोपेचा काहीएक उपयोग होत नाही. मुले गाढ झोपत असल्याने त्यांच्यात जास्त चपळता दिसून येते.

शांत, गाढ झोप येण्यासाठी काही उपाय करता येतात. हे उपाय केल्यास झोप पूर्ण होऊ शकते. यासाठी झोपण्यापूर्वी खोलीतील दिवे बंद करावेत. अंथरुणावर बसा आणि काहीही निरर्थक, कंटाळवाणे आवाज काढायला सुरुवात करावी. जसे ला, ला, ला आणि मन आणखी नवे आवाज काढील याची वाट पाहा. हे आवाज आणि शब्द माहीत असलेल्या भाषेतले नसावेत. हे थोडेसे विचित्र वाटत असले तरी त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. यासाठी अगदी लहान मुलांप्रमाणे करावे. डोळे बंद करून स्वत:त बुडून जावे. यामुळे आनंद वाटू लागेल. ही एक अद्भुत पद्धत आहे. ती अर्धजागृत मनात खोलवर जाते. यामुळे मन हलके होते.

हा उपाय करताना प्रथम थोडे अवघड वाटते. परंतु, एकदा सवय झाल्यानंतर खूप बरे वाटेल. या प्रयोगाची सवय झाल्यानंतर १५ मिनिटे अर्धजागृत मनातून येणाऱ्या त्या ध्वनींचे उच्चारण आणि भाषेप्रमाणे त्यांचा वापर करता येईल. मनाची स्वच्छता, तणाव हलका करणारेही अनेक ध्वनी आहेत. हे ध्वनी जागृत मनाला प्रगाढ विश्रांती देतात. १५ मिनिटांनंतर आडवे होऊन झोपी जावे. यानंतर गाढ झोप येईल. या प्रयोगाचा चांगला सराव झाल्यानंतर काही आठवड्यांतच गाढ झोपेचा अनुभव घेता येईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु