मासिक पाळी सुरु होण्याआधी मुलींना आवश्य द्या ‘या’ ५ गोष्टींची माहिती

मासिक पाळी सुरु होण्याआधी मुलींना आवश्य द्या ‘या’ ५ गोष्टींची माहिती

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – साधारणतः मुलींना  वयाच्या १४ ते १६ व्या वर्षी मासिक पाळी येते. आपल्याकडे मासिक पाळी विषयी अजून तरी जास्त बोलले जात नाही. त्यामुळे मुलींना याची जास्त माहिती नसते. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर काय करावे. हे मुलींना माहित नसते. त्यामुळे मासिक धर्म येण्याच्या अगोदर याविषयी मुलींना माहिती द्यावी.

१) महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना मासिक धर्माबाबत माहिती देताना त्यांना जेवढी माहिती पुरेशी आहे. तेवढीच माहिती दया. त्यामुळे मासिक धर्माबाबतच्या गोष्टींची भीती त्यांना वाटणार नाही. त्या जेव्हा त्या गोष्टींचा अनुभव घेतील तेव्हा त्यांना त्या गोष्टी आपोआप समजतील.

२)  तुमची मुलगी वयात आली तर तिला सांगा की, आता तुला मासिक पाळी येईल. आणि ती विचारील त्या प्रश्नांची तिला समजतील असे उत्तर द्या.

३)  मासिक धर्म आल्यावर सॅनेटरी नॅपकीनचा वापर कसा करायचा हे मुलींना समजून सांगा. आणि महत्वाचं म्हणजे मुलींना त्यांच्या मासिक पाळीची तारिख लक्षात ठेवायला सांगा.

४)  मासिक पाळी सुरु असताना सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती मुलींना द्या. तसेच स्किन रॅशेस आणि इन्फेक्शनपासून वाचण्याचे उपायही सांगा.

५)  एका छोट्याशी बॅग किंवा पाऊचमध्ये एक सेनॅटरी नॅपकीन आणि एक्स्ट्रा अंडरवेयर ठेवून बॅग तयार करा. ही छोटी बॅग ती आपल्या शाळेच्या बागेत ठेवू शकेल. यामुळे शाळा सुरू असताना जर तिला पिरियड्स आले तरी तिला भिती वाटणार नाही. याची माहिती मुलींना द्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु