जागरण, प्रवास, तापामुळे थकवा आलाय ! ‘हे’ ६ घरगुती उपाय करा

जागरण, प्रवास, तापामुळे थकवा आलाय ! ‘हे’ ६ घरगुती उपाय करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भूक लागणे, पोट साफ होणे. शांत झोप लागणे, कामात उत्साह वाटणे ही निरोगीपणाची लक्षणे आहेत. तर भूक न लागणे, अंग मोडून येणे, डोके दुखणे, डोळ्यासमोर ग्लानी येणे, चक्कर येणे, रात्री झोपेत पोट दुखणे, बसून राहावेसे वाटणे, कुणाशी बोलू नये असे वाटणे, डोळे मिटून पडून राहणे, चालताना दम लागणे, थकवा ही लक्षणे असल्यास शरीरात बिघाड असल्याचे समजावे. आजारानुसार थकव्यासाठी आयुर्वेदात काही खास उपाय सांगितले आहेत. या उपायांची माहिती जाणून घेवूयात.

हे उपाय करा

तापामुळे थकवा जाणवत असल्यास दूध गुणकारी आहे. सुंठ, खारीक, मनुका, साखर तूप घालून तापवून थंड करून मध घालून दूध घेतले तर हा थकवा निघून जातो. मात्र हा उपाय ताप उतरल्यावरच करावा. ताप असताना दूध पिऊ नये.

* जागरण, प्रवास, अधिक श्रम यामुळे थकवा आल्यास झोप घेणे, आराम करणे व फळांचा रस घेणे.

* उपवासामुळे थकवा आला असेल तर दूध, फळांचा रस, चहा, नारळ पाणी घ्यावे. थकवा दूर होतो.

* हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास थकवा येतो. यासाठी पौष्टिक आहारात खजूर, अंजीर, गाजर, बीट, पालक, मनुके इत्यादी खावे.

* रक्तदाब कमी झाल्याने थकवा येतो. हा थकवा कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस, खडीसाखर घालून दिवसातून तीन वेळेस घ्यावा.

* अतिसारामुळे थकवा आल्यास लिंबू सरबतमध्ये २ चिमूट शंखभस्म टाकून घ्यावे.

* अनिद्रेमुळे थकवा जाणवत असल्यास म्हशीचे दूध, खडीसाखर, बासुंदी इत्यादी पौष्टिक पदार्थ खावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु