स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

 
स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुमची मासिक पाळी चुकणे आणि आजारी असल्यासारखे वाटणे ही गर्भधारणेचे सामान्य लक्षण आहेत. परंतु तुम्ही गर्भवती असल्याचे  दर्शवणाऱ्या अन्य प्रारंभिक गर्भधारणा लक्षणांचाही समावेश आहे. तुम्हाला  खालीलपैकी कोणत्याही प्रारंभिक गर्भधारणेची लक्षणे आढळून आली तर तुम्ही प्रेग्नेंट असू शकता. घ्या जाणून ही लक्षणे कोणती असतात.

१)  मळमळणे, उलटी आल्यासारखे होणे, कोरड्या उलट्या होणे असे होऊ शकते. या गोष्टी मासिकपाळी सुरु असताना देखील होतात.

२) जर तुम्हांला सतत लघवीला जावे लागत असेल तर हे एक गरोदर असण्याच्या लक्षांपैकीचे एक लक्षण असते.

३) या काळात नेहमी आवडणारे पदार्थ किंवा वास नकोसे वाटतात. त्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे उलटीसारखे किंवा मळमळायला होते.

४) या काळात सतत मूड  बदलत राहतात.  भावुक होणे, सतत चिंता करणे, छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना रडायला येते,भीती वाटते.

५)  सुरूवातीच्या काही दिवसात खूप थकल्यासारखे जाणवते. याकाळात तुमचे शरीरात मोठी प्रक्रिया चालू असते.  त्यामुळे  खूप थकल्यासारखे जाणवते . कधी-कधी असा थकवा अशक्तपणाचे देखील लक्षण असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु