‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या

‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन – रक्तगट हे चार प्रकारचे असतात. ए, बी, एबी आणि ओ. निगेटिव्ह आणि पॉझेटिव्ह हे उपप्रकार मिळून ते आठ प्रकारचे होतात. रक्तगटानुसार आहार घेतल्यास आनुवंशिक रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. डायबिटीज, किडनी संबंधी आजार, कोलेस्टेरॉल, हायपरटेंशन यासाठी ते फायदेशीर आहे. रक्तगटानुसार आहार घेतला तर पचन चांगले होते. शरीरातील उर्जा वाढते आणि रोगांपासून बचाव होतो. महत्वाचे म्हणजे असा आहार घेतल्याने वजनही कमी होते.

हे लक्षात ठेवा

ब्लड ग्रुप ओ
कोबी, सलाद, ब्रोकली, मटण, मासे, अंडे, कांदा, काशीफळ, लाल मिरची, भेंडी, लसूण, अद्रक, चेरी, अंजीर, आलूबुखारा, रासबेरी, क्रेनबेरी, गूसबेरी, प्रोटीन, चीजयुक्त पदार्थ सेवन करावेत. अंड्याचे पांढरे बलक, मासे, चिकन, सँडविच, ढोकळा, डोसा, इडली, उत्तपा फायदेशीर आहे.

ब्लड ग्रुप बी
अंडे, हिरव्या पालेभाज्या, कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ आहारात घ्यावेत. ओट्स, दुधाचे पदार्थ, अ‍ॅनिमल प्रोटीन घ्यावेत. गहू जास्त खावू नयेत. ओट्स, प्रॉन्स, पनीर, अंडे, मासे, कोळंबी खावी.

ब्लड ग्रुप ए
काशीफळाच्या बिया, शेगादाणे, अंजीर, तांदूळ, ओट्स, मोहरी, पास्ता, लिंबू, बेदाणे, मनुखा, मेथीदाणे खावेत. गव्हाच्या जाड पिठाच्या चपात्या खाव्यात. मांसाहार जास्त फायदेशीर नसतो. गेहू, ब्राउन राइस, पास्ता, पोहे, सोयाबीन, बेसनाच्या वड्या खाव्यात.

ब्लड ग्रुप एबी
अंडे, बाजरी, ओट्स, मोहरी, सीफूड, दही, बकरीचे दूध, गेहू, मोड आलेले गहू, ब्रोकली, पत्ताकोबी, बीट,काकडी, आलूबुखारा, बेरी खाने जास्त फायदेशीर आहे. डाळभात, डाळपोळी, दलिया खिचडी, ब्राउन राइस, पुलाव हे सुद्धा फायदेशीर आहे. अक्रोड फायदेशीर आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु