‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन – कामाच्या ठिकाणी अनेक लोकांना आठतासांपेक्षा जास्त काळ एसीत बसावे लागते. सतत एसीत बसून काम केल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.एसी कृत्रिम तापमान तयार करत असल्याने त्याचा शरीरावर घातक प्रभाव पडतो, असे अलबामा युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. एसीमुळे होणारे आजार आणि त्यावरील उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

अशी काळजी घ्या

* एसीची हवा थेट डोक्यावर अथवा डोळ्यांवर येऊ नये.
* एसीच्या हवेतून थेट उन्हात जाऊ नका.
* ऑफिसमध्ये सतत एसी सुरू असेल तर एक किंवा दोन तासांमध्ये पाच ते सात मिनिटे मोकळ्या हवेत जाऊन या.
* शक्य असल्यास एसी प्रत्येक एक किंवा दोन तासांमध्ये काही काळ बंद ठेवा.

हे आजार होतात

डोळ्याच्या तक्रारी
कोरडेपणा वाढल्याने डोळ्यांमध्ये खाज, पाणी येणे, डोळे लाल होणे, अशा समस्या होऊ शकतात.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

कोरडी त्वचा

एसीच्या थंड हवेमुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. खाज येऊ शकते.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

दमा

दीर्घ काळ एसीमध्ये राहिल्याने दमा होऊ शकतो. सर्दी-पडसे किंवा धुळीची अ‍ॅलर्जी असल्यास दीर्घकाळ एसीमध्ये राहणे टाळावे.

Image result for दमा

मेंदूवर प्रभाव

मेंदूमधील पेशी कमी होतात. याचा ब्रेनवर वाईट प्रभाव पडतो. चक्कर येण्याची समस्या होऊ शकते.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

अस्वस्थता, तणाव

शरीराला एकाच तापमानाची सवय पडते. वेगळे हवामान किंवा थोडासा बदल सहन होत नाही. अस्वस्थपणा आणि तणावाची समस्या होऊ शकते.
Related image

सायनस

एसीच्या थंड हवेमुळे म्युकस ग्लँड हार्ड होतात. चार तासांपेक्षा जास्त काळ एसीमध्ये राहिल्यास सायनसचा धोका वाढतो.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय
थकवा
शरीराला आपले तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे थकवा येऊ शकतो.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

डोकेदुखी

सतत एसीमध्ये बसल्यामुळे रक्ताभिसरण खराब होते. यामुळे स्नायूंमध्ये वेदना होतात आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

अ‍ॅलर्जी

एसीचे फिल्टर दीर्घकाळ स्वच्छ नसतील, तर त्याच्या हवेमधून निघणारी धूळ आणि बॅक्टेरियामुळे सर्दी-पडसे, व्हायरल इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जी होऊ शकते.
Image result for अ‍ॅलर्जी
सांधेदुखी
एसीमधून निघणाऱ्या हवेमुळे मान, हात, गुडघ्यांमध्ये वेदना होतात. संधिवात होऊ शकतो.
‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु